सावरकर जयंतीनिमित्त “मंत्र पुष्पांजली” च्या छापील प्रतीचे वाटप, प्रत्येक हिंदूच्या घरी मंत्र पुष्पांजली पोहचवण्याचा पेशवा प्रतिष्ठान चा संकल्प.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य लक्षात घेत पेशवा प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यात आले. प्रत्येक हिंदूने मंत्र पुष्पांजली ही हिंदू प्रार्थना पठण करावी अशी इच्छा स्वा सावरकर यांची होती .त्यामुळे स्वा. सावरकर जयंतीनिमित्त मंत्र पुष्पांजली च्या छापील प्रतीचे वाटप करण्यात आले. तसेच वर्षभर जास्तीत जास्त लोकांपर्यंत मंत्र पुष्पांजली पोहोचवण्यासाठी पेशवा प्रतिष्ठान पुढाकार घेणार आहे.यावेळी भारत माता की जय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी दीनदयाल बँकेचे अध्यक्ष ॲड.मकरंद पत्की, प्रा अ.ल.जोशी, डॉ. सुधीर धर्मपात्रे, गजानन मुडेगावकर,अण्णा हजारे, अरुण काळे, दिलीप काळे, रमाकांत सेलमोहकर ,राहुल कुलकर्णी, डॉ. महेश अकोलकर, शिरीष हिरळकर, मकरंद कुलकर्णी, विवेक बाभुळगावकर, प्रमोद सांदिकर, डॉ गोपाळ चौसाळकर, डॉ प्रवीण जोशी, नरेंद्र सारनिकर, संजय कुलकर्णी, अर्जुन पेडगावकर,दुर्गादास दामोशन,अवधूत सेलूकर,तेजस हासेगावकर,विशाल जहागीरदार, आदित्य देशपांडे, प्रभाकर सेल्मोकर,अभय जोशी, संजय देशपांडे, महेश राडकर,सचिन पुराणिक, ज्ञानेश पाटील, संतोष देशपांडे, शशिकांत कुर्लेकर,मधुसूदन जहागीरदार,कल्याणी कुलकर्णी.सौ.उमा देशमुख,सौ.रोहिणी जड,सौ.स्मीता भातलवंडे,सौ.मनिषा कुलकर्णी,सौ.प्रणिता पोखरीकर,सौ.अपर्णा जोशी,सौ.अपर्णा भालेराव,सौ.मनिषा उपळाईकर, यांच्यासह सावरकर प्रेमी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ संकेत तोरंबेकर, श्रीकांत जोशी, हरिभाऊ माके , गौरव कुलकर्णी, पार्थ कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. नरहरी जोशी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक मंत्र पुष्पांजली पठण करण्यात आले.