भर उन्हाळ्यात शहरातील वारंवार खंडित होत असलेला विदयुत पुरवठा सुरळीत करण्याबाबत समस्त अंबाजोगाई करांची महावितरण अभियंत्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- संपूर्ण मे महिना अंबाजोगाई शहर उष्माघाताने होरपळून निघत आहे.अशा उकड्याच्या तसेच उष्माघाताच्या दिवसात महावितरण विभागाकडून दिवसातून पाच ते सहा तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. विद्यत पुरवठा खंडित झाल्याने गर्मी व उकड्यामुळे लहान मुले , वयोवृद्ध नागरीक अक्षरशः हैराण व त्रस्त होत आहेत. त्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. ऐन उकाड्यात सतत खंडित केला जात असलेला विद्युत पुरवठा अखंडित पणे सुरळीत चालू ठेवावा अशी मागणी अंबाजोगाई शहरातील राजकिशोर मोदी मित्र मंडळ व समस्त अंबाजोगाई करांच्या वतीने मुख्य कार्यकारी अभियंता महावितरण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर राजकिशोर मोदी मित्र मंडळाच्या अनेक सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की मागील काही दिवसापासून अंबाजोगाई शहरात शहर विकासाच्या नावाखाली रस्त्याची कामे चालू आहेत. ही कामे पावसाळा तोंडावर आला तरी देखील अतिशय कासव गतीने सुरू आहेत. रस्ता रुंदीकरण करताना रस्त्याच्या दुतर्फा नवीन विद्युत खांब लावण्यात येत आहेत. या नवीन खांबावर नवीन तार ओढण्याच्या नावाखाली शहरात दररोज सहा सहा तास विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. सततच्या खंडीत विदयुत पुरवठयामुळे नागरीक हैरान व त्रस्त झाले आहेत. सध्या प्रचंड उन्हाळाचे दिवस असून तीव्र उष्णतेमुळे वयोवृद्ध नागरीक व लहान मुले हताष झाले आहेत. शहरात दिवसातून पाच ते सहा तास विदयुत पुरवठा खंडीत केला जात आहे. याचा परिणाम पाणी पुरवढ्यावर देखील होत आहे. लाईटबाबत विचारणा केली असता त्यांच्या कर्मचा-यांकडून कसलाही प्रतिसाद दिला जात नाही. महावितरणाकडून विविध कारणे देवून सतत विदयुत पुरवठा खंडीत केला जात आहे. यावरून शहरात महावितरण व विज कर्मचा-यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे अंबाजोगाई शहरात चर्चिले जात आहे. तेव्हा मुख्य कार्यकारी अभियंता महावितरण साहेबानी याकडे गांभीर्याने पाहुन शहरवासियांना कशाप्रकारे दिलासा मिळेल व विद्युत पुरवठा सतत अखंडित पणे व सुरळीत सुरू ठेवला जाईल याकडे लक्ष दयावे अशी विनंती समस्त अंबाजोगाई करांच्या वतीने एका जाहीर निवेदनाद्वारे केली आहे. विस्कळीत झालेली विद्युत वितरण व्यवस्था तात्काळ सुरळीत व नियमित न झाल्यास अंबाजोगाई करांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा देखील राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेल्या निवेदन प्रसंगी देण्यात आला. सदरील निवेदन महावितरण कार्यालयात देतांना माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा,बबन लोमटे, महादेव आदमाणे,तानाजी देशमुख, दिनेश भराडीया, धम्मा सरवदे, अकबर पठाण,दत्ता सरवदे,सचिन जाधव, रफिक गवळी, आकाश कऱ्हाड, वजीर शेख,मतीनं जरगर, शुभम लखेरा, जमादार पठाण, अस्लम शेख, संतोष चिमणे, भारत जोगदंड, शरद काळे, महेश वेडे, आशीष ढेले याच्यासह अनेकजण उपस्थित होते.