प्रशांत गोळे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी फेरनिवड
कौन कहता है बोल बाला है झूट का..! नियुक्तीनंतर चहात्यांच्या प्रतिक्रिया
वाशिम:-आपल्या संघटन कौशल्याच्या बळावर युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले उच्चशिक्षित जनसामान्यांच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर असणारे प्रा. प्रशांत सुधीर गोळे पाटील यांची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली आहे. यावेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे. यावेळी वाशिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ शेठ पुंजानी, कारंजा नगरीचे माजी नगराध्यक्ष दत्तरावजी डहाके, महिला जिल्हाध्यक्ष माधवीताई झनक, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष आकाश शिंदे, यांची उपस्थिती होती. मागील काही महिन्यापूर्वी प्रशांत गोळे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावरून अचानक बडतर्फी करण्यात आली होती यामुळे त्यांच्या चाहत्यांना एण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक धक्काच बसला होता.
जिल्ह्यातील काही व्यक्तींनी पक्षांच्या वरिष्ठाकडे चुकीची माहिती देऊन प्रशांत गोळे पाटील यांच्या विरोधात तक्रार केली होती आणि तत्काळ त्यांना बडतर्फ करण्याची मागणी देखील केली होती. यामुळे काही दिवसाकरिता प्रशांत गोळे यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले होते. परंतु सत्य परिस्थिती काय हे पक्षश्रेष्ठीच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ प्रशांत गोळे यांना पुनश्च त्या पदावर फेरनिवड केली आहे. त्यामुळे प्रशांत गोळे पाटील यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे. प्रशांत गोळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर रिसोड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस ही मजबुतीकरण करण्याचे जोरदार प्रयत्न केले. आणि याला मोठ्या प्रमाणात यश देखील प्राप्त झाले हीच बाब विरोधकांच्या पचनी न पडणारी होती. म्हणूनच काही लोकांना हाताशी धरून चुकीची माहिती पक्षाला देऊन त्यांची बडतर्फी करण्यात आली होती असे जाणकार आपले मत व्यक्त करताना दिसत आहेत. परंतु बडतर्फे झाल्यानंतर प्रशांत गोळे यांच्याकडून विरोधकांवर कोणत्याच प्रकारची टीकाटिपणी न केली ही बाब अत्यंत प्रेरणादायीच होती.