दहावीच्या परीक्षेत हॅप्पी किड्स इंग्लिश मीडियम स्कूल चा 100 टक्के निकाल.
कवठे महांकाळ तालुक्यातील एकमेव निसर्गरम्य वातावरणामध्ये सुसज्ज इमारत अनुभवी स्टाफ अनुभवी शिक्षक ज्ञानभारती शिक्षण संस्था संचलित हॅप्पी किड्स इंग्लिश मीडियम स्कूल तालुक्यातील शंभर टक्के निकाल देणारी स्कूल कवठे महांकाळ येथील ज्ञानभारती शिक्षण संस्था संचलित हॅप्पी किड्स इंग्लिश मिडीयम स्कूल ची महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळामार्फत झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली.विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.सर्वाधिक गुण मिळवलेले विद्यार्थी आर्या रमेश वाघमारे (89.20%) दृष्टी पाटील (88.80%) अथर्व जगताप(88.20%) (88.40%) श्रेया शिखरखाने (87.60%) समृद्धी पांढरे (86.80%) समीक्षा हजारे(86.60%) श्रेया पाटोळे(86.60%) स्नेहल पाटील(86.20%) या विषयात सर्वाधिक गुण मिळवले आहेत. या विद्यार्थ्यांचे ज्ञानभारती शिक्षण संस्था संचलित हॅप्पी किड्स इंग्लिश मिडीयम स्कूलचे सरचिटणीस एडवोकेट दिनेश कोठावळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना ज्ञानभारती शिक्षण संस्था सरचिटणीस अध्यक्ष प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी पालक व प्रिन्सिपल नायडू सर यांचे मार्गदर्शन लाभले.