कू.किमया अंबाड हिने NEET मध्ये ६४६ गुण संपादन केल्यामुळे राजकिशोर मोदी यांच्या वतीने सन्मान
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- नुकत्याच देशभरात नीट च्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले. अंबाजोगाई शहरात देखील नीट परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्येच शहरातील कु किमया वैजनाथ अंबाड या विद्यार्थिनीने नीट परीक्षेत ७२० पैकी ६४६ गुण मिळवल्यामुळे त्या विद्यार्थिनीचा राजकिशोर मोदी यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. सत्कार करताना किमया हिला फेटा बांधून शाल व पुष्पगुच्छ देऊन तिला गौरविण्यात आले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष मनोज लाखेरा,महादेव आदमाणे, विजय रापतवार,खलील जाफरी, अस्लम शेख, यांच्यासह कु किमया हिचे पालक वैजनाथ अंबाड, बालाजी अंबाड हे उपस्थित होते.
कु. किमया हिचे इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण हे न्यू व्हिजन पब्लिक स्कुल येथे झाले होते तर राजश्री शाहू महाविद्यालय लातूर इथे संपन्न झाले. अथक परिश्रम व वेळेवर तसेच नीटनेटका अभ्यास तसेच गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन केल्यामुळे आज मी हे यश संपादन करू शकल्याची कबूली कु किमया हिने दिली.
या सन्मान सोहळा प्रसंगी राजकिशोर मोदी यांनी कु किमया व तिच्या पालकांचे अभिनंदन केले. आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थी आपल्या जीवाचा आटापिटा करतांना दिसून येत आहेत. बारा बारा सोळा सोळा तास अभ्यास करून विद्यार्थी अभ्यास करून या स्पर्धेत टिकण्यासाठी धडपड करताना दिसत असल्याचे राजकिशोर मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले. विद्यार्थ्यांचे पालक देखील त्यांना वेळोवेळी सहकार्य करत असून पालकांची देखील जणू काही परीक्षाच असल्याचे चित्र निर्माण होतांना दिसत असल्याचे राजकिशोर मोदी यांनी नमूद केले. यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतांना राजकिशोर मोदी यांनी यापुढील शैक्षणिक काळात कसलीही अडचण येऊ देणार नसल्याची ग्वाही याप्रसंगी राजकिशोर मोदी यांनी यावेळी दिली. या सन्मानपर कार्यक्रमाचे संचलन शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे विजय रापतवार यांनी केले तर आभार महादेव आदमाणे यांनी व्यक्त केले.