Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»देवळाली प्रवरातील अल्पवयीन तरुणी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या
    Ahmednagar

    देवळाली प्रवरातील अल्पवयीन तरुणी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

    newstoday24By newstoday24June 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    देवळाली प्रवरातील अल्पवयीन तरुणी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

    राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ६ वाजता राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील आरडगाव चौकात घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

    याबाबत समजेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा परिसरातील दवणगाव रोडवरील रहिवाशी असलेली जागृती विश्वास शिंदे ही राहुरी फॅक्टरी येथील एका खासगी शाळेत इयत्ता १० वीच्या परीक्षेत शिक्षण घेऊन उत्तीर्ण झाली होती. दोन दिवसापूर्वी तिने देवळाली प्रवरातील महाविद्यालयात ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता.

    आज शुक्रवारी सकाळी ६ वाजता जागृती शिंदे ही सायकल घेऊन देवळाली गावात येथे खासगी क्लाससाठी घरा बाहेर पडली. तिने क्लासला न जाता टाकळीमिया येथील आरडगाव चौकी येथे पोहोचून रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान घटनास्थळी पोलीस कर्मचारी दीपक आव्हाड यांनी धाव देऊन पंचनामा केला. जागृती शिंदे हिचा मृतदेह रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेद्वारे राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. जागृती हिने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
    News Toay 24 साठी राजेंद्र उंडे राहुरी

    #Ahmednagar #Breaking #rod #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleकू.किमया अंबाड हिने NEET मध्ये ६४६ गुण संपादन केल्यामुळे राजकिशोर मोदी यांच्या वतीने सन्मान
    Next Article स्मार्ट मीटर बंद करा अन्यथा महावितरणला टाळे ठोकू – ‘आप’ चा महावितरणला इशारा…
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.