स्मार्ट मीटर बंद करा अन्यथा महावितरणला टाळे ठोकू – ‘आप’ चा महावितरणला इशारा…
आम आदमी पार्टी कडून महावितरणला स्मार्ट विद्युत मीटर बंद करण्याच्या मागणीसाठी निवेदन वजा इशारा देण्यात आला.महाराष्ट्रात सक्तीचे केले गेलेले, विद्युत स्मार्ट मीटर लावण्यास महाराष्ट्रातील जनतेकडून कडाडून विरोध होत आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आर्थिक शोषण करण्याचे काम महाराष्ट्र सरकार व एम एस ई डी सी एल यांच्या सहाय्याने देशातील अदानी सारख्या काही भांडवलदारी कंपन्या करत आहे.या अनुषंगाने आम आदमी पार्टी लातूरचे जिल्हाध्यक्ष आश्विन नलबले यांनी महावितरण अधीक्षकाला तातडीने स्मार्ट मीटर बसविणे बंद करा अन्यथा महावितरणला टाळे ठोकू असा निवेदन वजा इशारा दिला. भारत सरकारकडून ऑगस्ट २०२१ मध्ये हा कायदा भांडवलदारी कंपन्यांना फायदा व्हावा या हेतूने पारित केल्याचे निदर्शनास येत असून जनतेवर वाढीव बोजा टाकण्याचे षडयंत्र २०२१ पासून नियोजित होते.२० किलो व्हॅट किंवा २७ हॉर्स पॉवर पेक्षा कमी विद्युत दाब असणारे विद्युत उपभोक्ता म्हणजेच सर्वसामान्य कुटुंबे, गोरगरीब जनता, शेतकरी, लघु उद्योजक, व्यावसायिक यांच्या वर जाणीव पूर्वक अन्यायकारक धोरण ठरवून घेतलेला हा निर्णय आहे.मार्च २०२५ पर्यंत विद्युत स्मार्ट मीटर लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून यातून फक्त आणि फक्त जनतेचे नुकसान आहे.केंद्र सरकारची भूमिका ही जनहित विरोधी व भांडवलदार स्नेही आहे. संपुर्ण भारतात २२ कोटी २३ लाख विद्युत मीटर बदलवायचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांचे मोठे आर्थिक शोषण होणार आहे. त्यास आम आदमी पार्टीचा विरोध आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले, महासचिव सुमित दीक्षित, जिल्हा संघटक अमित पांडे, जिल्हा संघटक आकाश मोठेराव, जिल्हा संघटक ओंकार गोटेकर , जिल्हा सहसचिव आकाश कांबळे, मोहम्मद रफीक शेख. साहिल तांबोळी, आनंदा कामगुंडा , नरेश तौर पाटील, दानिश शेख , आश्रुबा नरसिंगे, अब्दुल शेख, विश्वकर्मा शंके, आदित्य सोमवंशी, करण बनसोडे, अक्षय गायकवाड ,
विवेक वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
News today 24 असलम शेख लातुर,