कवठेमहांकाळच्या डॉ हर्षला कदम यांच्या मदतीने विद्यार्थिनीस मिळाले शिक्षणाचे बळ
कवठे महांकाळ शहरातील एका महिला डॉक्टरच्या सहकार्याने कशिश पांढरे ह्या विद्यार्थिनीस शैक्षणिक क्षेत्रात झेप घेण्याची संधी मिळाली.तिच्या स्वप्नांना पंख मिळाले.तिच्या भविष्याची छान सुरवात झाली. याबाबत अधिक माहिती अशी कांहीं दिवसापूर्वी एक विद्यार्थिनी पी.व्ही.पी.महाविद्यालय कवठेमहांकाळ येथील प्रांगणाच्या कोपऱ्यात निराश होऊन रडताना दिसली.तिच्याकडे जाऊन माहिती घेतली असता समजले की कशिश पांढरे ही कवठेमहांकाळ येथील गरीब कुटुंबातील अत्यंत हुशार विद्यार्थिनी घरची परिस्थिती हालाखीची आहे.आकाशाला गवासणी घालण्याची इच्छा असताना लहानपणीच आई-वडिलांच दोघांचेही डोक्यावरच छत्र हरपलं आहे. तरी पण तिने आपली जिद्द सोडली नाही. तरीसुद्धा कशिश पांढरे हिने जिद्दीने शिक्षण सुरू ठेवले.मात्र बी.ए. द्वितीय वर्षात प्रवेश घेण्यासाठी घेण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते.ही माहिती कवठेमहांकाळ येथील डॉ हर्षला कदम यांना याबाबत कल्पना दिली. त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत क्षणाचाही विलंब न लावता, जागेवर कुठल्याही प्रकारचा विचार न करता कॉलेजमध्ये सदर विद्यार्थ्यांचे भेट घेऊन तिला शैक्षणिक साहित्य,बॅग अशी मदत केली. त्यांच्या या मदतीमुळे कु कशीश पांढरे हिच्या शैक्षणिक परवाला नव्याने सुरुवात झाली.तिला शिक्षणाचे बळ मिळाले. याबद्दल तिने डॉ हर्षल कदम यांचे मनोमन आभार मानले.
न्यूज टुडे साठी सांगलीहून सनी लोंढे