भिमशक्तीच्या बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी भिमराव सरवदे यांची नियुक्ती.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी धर्मनिरपेक्षपणे लढणारी संघटना म्हणून भिमशक्तीची सर्वदूर ओळख आहे. भिमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष खासदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी स्वतःचे हस्ते नियुक्तीपत्र देवून भिमशक्तीच्या बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी भिमराव सरवदे यांची नियुक्ती केली आहे.
येथील आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू कार्यकर्ते भिमराव वामनराव सरवदे हे मागील वीस वर्षांपासून सामाजिक व दलित चळवळी मध्ये कार्यरत आहेत. चळवळी मध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रख्यात गायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे, साहेबराव येरेकर यांचे कार्यक्रम घेऊन त्यांनी चळवळीच्या माध्यमातून प्रबोधनाचा वारसा जोपासला आहे. बांधिलकी जोपासत गोरगरीब, गरजू लोकांना दवाखाना असो, तहसील असो किंवा पोलिस स्टेशन येथे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरवदे हे कायमच जनसेवा करीत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन खासदार तथा राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते सरवदे यांना नियुक्तीपत्र देवून त्यांची भिमशक्तीच्या बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक महासचिव मोहनराव माने, मुंबई प्रदेशाध्यक्ष शशिकांत बनसोडे भिमशक्ती अंधेरी पूर्वचे उद्धव अवचारे, सुमित भैय्या आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. भिमराव सरवदे यांच्या निवडीचे बीड जिल्ह्यातून स्वागत होत आहे.
भिमशक्तीच्या माध्यमातून चळवळीला बळ व हंडोरे साहेबांना ताकद देणार :
खासदार तथा राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी माझी नियुक्ती करून मोठी जबाबदारी सोपवली आहे. याचा मी स्विकार केला आहे. त्यांच्या विश्वासाला कदापीही तडा जाऊ देणार नाही. पुढील काळात संघटना बांधणी करून, संघटनेच्या सर्व आजी – माजी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन भिमशक्तीच्या माध्यमातून चळवळीला बळ व हंडोरे साहेबांना ताकद देणार आहोत.
– भिमराव सरवदे (भिमशक्ती, जिल्हा कार्याध्यक्ष, बीड.)