वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
पुसद : शेतात काम करून परत येत असताना अचानक वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.
पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जनुना या गावातील रहिवासी संतोष नारायण वाळसे या 37 वर्षीय इसमाचा विज पडून मृत्यु झाला. हि घटना काल 15 जुन 2024 रोजी दुपारी चार वाजता चे दरम्यान घडली. आज 16 जुन रोजी उपजिल्हा रुग्णालय, पुसद येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचे मृत्यु पश्चात वडील, पत्नी, दोन मुलं व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती कळताच नायब तहसिलदार कदम, यांनी भेट दिली.
पुसद यवतमाळ