Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»आजार पणाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
    Ahmednagar

    आजार पणाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

    newstoday24By newstoday24June 17, 2024Updated:June 17, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आजार पणाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

    कुटुंबासह गावातील सर्वजण बकरी ईद सणाच्या आनंदात असताना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील 28 वर्षीय विवाहित तरुणाने आज सोमवारी सकाळी टाकळीमिया येथील रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सणाच्या दिवशी या तरुणाने आत्महत्या केल्याने कुटुंबासह गाव दुःखाच्या डोंगरात बुडाले.आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे आसिफ आयुब पठाण असे नाव असुन आजार पणाला कंटाळून त्याने आत्महत्या केलेल्याचे समोर आले आहे.
    मुसळवाडी ता. राहुरी येथिल 28 वर्ष विवाहित तरुण आसिफ आयुब पठाण याने ऐन बकरी ईद सणाच्या दिवशीच आपली जीवनयात्रा संपविल्याने नातेवाईकांनी शोक व्यक्त केला आहे. सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास टाकळीमिया रेल्वेस्थानक परिसरात येऊन धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. यानंतर स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली.त्यानंतर घटनास्थळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राहुल यादव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह देवळाली प्रवरातील रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दुपारी शोकाकुल वातावरणात आयुब याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत आसिफ याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. आसिफ हा हॉटेलात आचारी काम करून आपली उपजीविका चालवत होता. आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती चर्चेतून समजते. मात्र पोलीस तपासात आधिक माहिती उजेडात येणार आहे.याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत आव्हाड हे करीत आहेत.

    News Today 24 साठी प्रतिनिधी राजेंद्र उंडे राहुरी

    #Ahmednagar #Breaking #rod #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleवीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
    Next Article अहमदनगर शहरात बकरी ईद उत्साहात साजरी…
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.