Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»अहमदनगर शहरात बकरी ईद उत्साहात साजरी…
    Ahmednagar

    अहमदनगर शहरात बकरी ईद उत्साहात साजरी…

    newstoday24By newstoday24June 17, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शहरात बकरी ईद उत्साहात साजरी…

    शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना

    प्रत्यक्ष भेटीगाठीसह सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

    अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) सोमवारी (दि.17 जून) मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील ईदगाह मैदान येथे सकाळी 9:30 वाजता ईदची नमाज मौलाना नदिम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शहरातील मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
    नमाजच्या प्रारंभी धार्मिक व्याख्यान, नमाजनंतर खुदबा व त्यानंतर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली. देशात शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना करण्यात आली. सकाळी 7 वाजल्यापासून शहरातील विविध मशिदी मधून बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली. ईदनिमित्त प्रमुख नमाज पठण कोठला येथील ईदगाह मैदानात झाले. मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या भेटी-गाठी घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
    पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून ईदगाह मैदानसह शहरातील चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोठला येथून जाणारी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती. नमाजनंतर शहरातील विविध कब्रस्तान व दर्गामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
    या बकरी ईदनिमित्त कुर्बानीसाठी लागणारे बोकडं खरेदी-विक्रीत जिल्ह्यात कोट्यावधीची उलाढाल झाली. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आठवडे बाजारात बोकडांची खरेदी विक्री सुरु होती. बकरी ईदला कुर्बानीसाठी लागणारे बोकडांच्या किंमतीमध्ये या वर्षी मोठी वाढ दिसून आली. बकरी ईद निमित्त तीन दिवस म्हणजे सोमवार पासून बुधवार पर्यंत घरोघरी कुर्बानी केली जाणार आहे. सोशल मीडियावर देखील बकरी ईदच्या शुभेच्छांचा पाऊस पडला होता.

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleआजार पणाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
    Next Article मनपा माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.