नियोजित ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाची तयारी सुरु
स्वागताध्यक्षांनी जाहीर केली स्वागत समिती
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने यावर्षी घेण्यात येणा-या ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाची तयारी मसाप कार्यकारिणी आणि स्वागताध्यक्ष यांनी सुरु केली असून स्वागत समिती ची घोषणा स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी केली आहे.
११व्या नियोजित अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या यशस्वी नियोजनासाठी सभासद झालेल्या सदस्यांपैकी स्वागत समिती घोषित करण्यात येते. ही समिती घोषित करण्यासाठी मसाप अंबाजोगाई शाखेच्या कार्यकारिणी सदस्य आणि साहित्य संमेलन सभासद यांची व्यापक बैठक पत्रकार कक्षात स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत १५ सदस्य असलेल्या सदस्यांची स्वागत समितीची घोषणा करण्यात आली. या स्वागत समिती मध्ये साहित्य, शिक्षण आणि सामाजिक कार्याशी निगडीत असलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. तीन महिला सदस्यांसह १२ पुरुषांचा समावेश या स्वागत समितीमध्ये करण्यात आला आहे. या स्वागत समिती सदस्यांमध्ये चंद्रकला देशमुख, वंदना तेलंग, जयश्री डोंगरे-कराड, सुभाष बाहेती, प्रा. पंडित कराड, विजय रापतवार, डॉ. देवराव चामनर, पत्रकार दत्ता अंबेकर, सुनील व्यवहारे, विष्णू सरवदे, गोरख शेंद्रे, ऍड. जयंत भारजकर, प्रा. नागेश जोंधळे, अश्रब पठाण आणि विशाल जगताप यांचा समावेश करण्यात आला आहे. नियोजित ११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जाहीर करण्यात येणाऱ्या स्वागत समिती नियुक्त करावयासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मसाप कार्यकारिणीचे सदस्य, स्वागत समिती मध्ये घेतलेले सदस्य व साहित्य प्रेमी मंडळींनी या बैठकीत सहभाग घेतला.
या बैठकीचे संचालन मसापचे सचीव गोरख शेंद्रे यांनी केले. साहित्य संमेलन यशस्वीतेसाठी निवडण्यात आलेल्या सदस्यांची नावे स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी जाहीर केली. स्वागत समितीत घेण्यात आलेल्या सदस्यांनी सभासद नोंदणीच्या कामाला प्राधान्य देवून संमेलनाच्या पुर्व तयारी साठी आयोजित करण्यात आलेल्या सर्व बैठकीत उस्फुर्तपणे सहभाग घेवून संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सुदर्शन रापतवार यांनी केले. या बैठकीत प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत समितीचे सदस्य वंदना तेलंग, चंद्रकला देशमुख, विष्णू सरवदे, विजय रापतवार, डॉ. देवराव चामनर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेवून असे आश्वासन दिले. मसापचे अध्यक्ष दगडू लोमटे यांनी या बैठकीस मार्गदर्शन करताना संमेलनाच्या रुपरेशेची माहिती दिली. मसाप कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. शैलजा बरुरे, डॉ. राहुल धाकडे, तिलोत्तमा पतकराव, प्रा. डॉ. देविदास खोडेवाड, अमृत महाजन आणि उपस्थित सहकारी मुजीब काजी, प्रा. डॉ . कल्याण सावंत, शरद लंगे, काकडे गुरुजी, नंदकुमार बलुतकर, व सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. सदरील बैठक उत्स्फूर्त वातावरणात पार पडली. उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार स्वागत समितीचे सदस्य व शिक्षक मैत्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजय रापतवार यांनी मानले.