कार मध्ये बसून रिल्स बनवणे पडले महागात; कार दरीत कोसळून युवती ठार
दौलताबाद परिसरातील सुलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ घडली घटना; तरुणी संभाजीनगर शहरातील रहिवासी.
तरुणी नवीन असल्याने कार पुढे नेण्याऐवजी मागे नेल्याने कार दरीत कोसळली
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात असणाऱ्या सूलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ कार मध्ये बसून रिल्स बनवणे एका युतीला चांगलंच महागात पडल. कार चालवायला नवीन असलेली तरुणी कार चालवत असताना रील बनवत होती. त्यावेळीं तिने पुढे नेण्याच्या ऐवजी मागे नेली आणि तिथेच दरीत कोसळली यामध्ये 23 वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झालाय. श्वेता दीपक सुरवसे अस या तरुणीचं नाव आहे. ही तरुणी आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे हे दोघेही संभाजीनगर येथून एका कारणे दत्त मंदिर परिसरात आले होते. या ठिकाणी मोबाईलवर रिल्स बनवताना तिने तिच्या मित्राला सांगितले की मी पण कार चालून बघते मात्र ही तरुणी कार चालवायला नवीन असल्याने तिने पुढे नेण्याऐवजी कारचा रिव्हर्स गिअर टाकला आणि ही कार थेट दरीत कोसळली. यामध्ये तिला निष्पाप जीव गमावा लागला. सुलीभंजन येथील दत्त मंदिराचा परिसर पावसाळ्यामुळे निसर्गरम्य असतो त्यामुळे अनेक पर्यटक तिथे येत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रिल्स बनवत असतात मात्र या तरुणीला रिल्स बनवण जीवावर बेतले.
(प्रतिनिधीःविशाल जोशी छत्रपती संभाजीनगर)