Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»चुरमुरा येथे वीज पडून २१ बकऱ्या मृत ,सुदैवाने मनुष्य हानी नाही 59 शेळ्या बचावल्या.
    Maharashtra

    चुरमुरा येथे वीज पडून २१ बकऱ्या मृत ,सुदैवाने मनुष्य हानी नाही 59 शेळ्या बचावल्या.

    newstoday24By newstoday24June 18, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चुरमुरा येथे वीज पडून २१ बकऱ्या मृत ,सुदैवाने मनुष्य हानी नाही 59 शेळ्या बचावल्या.

    सर्वत्र बकरी ईद उत्साहात साजरी होत असताना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील चुरमुरा येथे अचानक आलेल्या वादळ वारा व विजेच्या कडकडाटासह पावसात झाडावर वीज कोसळून झाडाखाली असलेल्या १७ बकऱ्या व ४ बोकड मृतपावले . ही घटना चुरमुरा शिवारात येथे दुपारी तीन वाजता च्या दरम्यान घडली सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही . उमरखेड तालुक्यातील चुरमुरा येथे आज दुपारी अडीच ते तीन च्या दरम्यान अचानक सोसाट्याचा वादळी वारा सुरू झाला यात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने पावसापासून बचावासाठी काही बकऱ्या मोहाच्या झाडाखाली गेल्या . नेमकी त्याच वेळी झाडावर वीज पडून 21 बकऱ्या मृत्युमुखी पडल्या .चुरमुरा गावातील बंजारा तांडा येथील समाधान फुलसिंग राठोड हा बकरी चारक 80 बकऱ्या घेऊन चरण्यासाठी जंगलात गेला होता . यामध्ये चुरमुरा येथील जवळपास 17 शेतकऱ्यांच्या बकऱ्या मृत झाल्या असून मोलमजुरी करून बकऱ्या घेऊन संगोपन करणाऱ्या पोटाची खळगी भरणाऱ्या या शेळी मालकांवर मोठे संकट ओढवले आहे . बकरी ईदच्या दिवशी आलेल्या संकटाने हळहळ व्यक्त केल्या जात आहे . घटनेची माहिती मिळताच तहसीलदार राजू सुरडकर यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . कुंभारे समवेत घटनास्थळाला भेट दिली .व तात्काळ मृत झालेल्या सर्व बकरी व बोकडचे शवविच्छेदन करण्यात आले . या सर्व पशुधारकांना आता सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे . .

    उमरखेड यवतमाळ ब्युरो

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleकार मध्ये बसून रिल्स बनवणे पडले महागात; कार दरीत कोसळून युवती ठार
    Next Article नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती निकृष्ट पद्धतीने सूरु आहे.राहुरी फँक्टरीच्या वृद्धाचा निष्पाप बळी
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.