Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती निकृष्ट पद्धतीने सूरु आहे.राहुरी फँक्टरीच्या वृद्धाचा निष्पाप बळी
    Ahmednagar

    नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती निकृष्ट पद्धतीने सूरु आहे.राहुरी फँक्टरीच्या वृद्धाचा निष्पाप बळी

    newstoday24By newstoday24June 19, 2024Updated:June 19, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती निकृष्ट पद्धतीने सूरु आहे.राहुरी फँक्टरीच्या वृद्धाचा निष्पाप बळी

    रस्ता खोदला पावसाने ठिकठिकाणी खड्डे पडले, आणखी किती बळी घेणार

    अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावर सेल पेट्रोल पंपानजीक इर्टीगा कार व दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात दुचाकीवरील राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी रंगनाथ गंगाधर आरंगळे(वय-६१) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज बुधवारी सकाळी घडली आहे. शिर्डीकडून शनिशिंगणापूरकडे परराज्यातील भाविक घेऊन चाललेल्या एम एच २० एफ जी-७०२७ या इर्टीगा कारने फॅक्टरीकरून लोणीकडे जनावरांच्या बाजारासाठी हिरो होंडा पॅशन क्रमांक एमएच १७ ए एस -१६२२ या दुचाकीस जोराची धडकी दिली. या धडकेत दुचाकीचालक राहुरी फॅक्टरी वृंदावन कॉलनी जवळील आरंगळे वस्तीवरील रहिवासी रंगनाथ गंगाधर आरंगळे(वय-६१) यांचा जागीच मृत्यू झाला.तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले शंकर रामचंद्र शिंदे(राहुरी फॅक्टरी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राहुरी शहरातील लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सूरु आहेत. अपघातानंतर ईर्टीगा कारने तीन ते चार पलटी मारल्या. या ईर्टीगा कारमधील उडीसा राज्यातील सुस्मिता संतोष पुष्टी(वय-४६) हे जखमी असून त्यांच्यावर राहुरीत लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनास्थळी रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे व पप्पू कांबळे यांच्या मदतीने रंगनाथ आरंगळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात तसेच जखमींना राहुरीत उपचाराठी नेले. अपघातस्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकोन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. राहुरी फॅक्टरी येथील मयत रंगनाथ आरंगळे यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले, दोन मुली, जावई सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कामासाठी ठिकठिकाणी एक बाजूला रस्ता खोदला असून एकेरी वाहतूक सूरु आहे. नगर-मनमाड रस्त्याचे काम अतिशय संथगतीने व निकृष्ट पद्धतीने सूरु आहे. दुरुस्त केलेल्या रस्त्यावर पहिल्याच पावसाने ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या रस्त्यावर अनेक निष्पाप बळी गेले असून आणखी किती बळी हा रस्ता घेणार असा सवाल युवा नेते सुजित सुरेश वाबळे यांनी उपस्थित केला आहे.

    News Today 24 साठी राजेंद्र उंडे राहुरी

    #Ahmednagar #Breaking #Class
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleचुरमुरा येथे वीज पडून २१ बकऱ्या मृत ,सुदैवाने मनुष्य हानी नाही 59 शेळ्या बचावल्या.
    Next Article विद्युत वाहिनीच्या खांबावर काम करत असताना युवकाचा मृत्यू
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.