Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»विद्युत वाहिनीच्या खांबावर काम करत असताना युवकाचा मृत्यू
    Maharashtra

    विद्युत वाहिनीच्या खांबावर काम करत असताना युवकाचा मृत्यू

    newstoday24By newstoday24June 22, 2024Updated:June 22, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विद्युत वाहिनीच्या खांबावर काम करत असताना युवकाचा मृत्यू

      मुख्य विज वाहिनीच्या खांबावर चढून काम करीत असताना अचानक प्रवाह आल्याने शॉक लागून माना येथील २९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील भट्टड लेआउट जवळील तुलशी नगर येथे घडली.

    मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील आकाश बनसोड हा २९ वर्षीय युवक विज वितरण कंपनीच्या कामास कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शहरातील भट्टड लेआउट जवळील तुलसी नगर स्थित दुपार पासूनच काम सुरु असल्याने विद्युत खांबावर काम करीत असतांना सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अचानक वाहिनीत विद्युत प्रवाह आल्याने आकाश चा विद्युत खांबावर शॉक लागून जागीच मृत्यू झाला.विज वितरण कंपनी च्या वतीने पावसाळ्या पूर्वीचे शहरात काम सुरु आहे. यात काही विज वितरण कंपनीचे कर्मचारी तर कॉन्ट्रॅक्टर चे कर्मचारी कार्यरत आहेत. कुठल्याही ठिकाणी विज वितरण कंपनीचे काम सुरु असतांना मेन ट्रांसफार्मर वरून लाईन बंद करून त्या ट्रान्सफर जवळ विज वितरण कंपनीचा कर्मचारी पूर्ण काम समपेपर्यंत हजर असतो मात्र आज घडलेल्या घटनेत विज वितरण कंपनीचा एकच कर्मचारी असल्याने सदर लाईन मन हा ज्या ठिकाणी मुख्य काम सुरु होते त्याच ठिकाणी हजर होता तर ट्रांसफार्मर जवळ कुठलाही कर्मचारी नव्हता.शासनाच्या नियमानुसार कुठलाही कर्मचारी खांबावर अथवा इतरत्र विद्युतचे काम करत असल्यास त्यास वीज वितरण कंपनी अथवा कॉन्ट्रॅक्टदार कडून सेफ्टी देणे अनिवार्य असतात. परंतु सदर कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टदार कडून कुठलेही सेफ्टी न दिल्याने सदर घटना घडली असावी हे नाकारता येत नाही. मात्र या सर्वात आकाश चा कामाचा पहिला दिवसच अखेर चा ठरला. असला तरी शहरातील गेल्या महिन्याभरातील ही दुसरी घटना असून विज वितरण कंपनी ही आपली जिम्मेदारीच नसल्याचे सांगून यातून पळ काढत आहे. मृत आकाश यांच्या नातेवाईकांनी जो पर्यंत जिल्हाधिकारी येथे येऊन योग्य न्याय मिळवून देण्याचे आश्वासित करीत नाहीत तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

    News Today 24 साठी सुमित सोनोने,मूर्तिजापूर जिल्हा अकोला

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleनगर-मनमाड रस्ता दुरुस्ती निकृष्ट पद्धतीने सूरु आहे.राहुरी फँक्टरीच्या वृद्धाचा निष्पाप बळी
    Next Article मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करू देणे काळाची गरज – राहुल कुलकर्णी
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.