मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करू देणे काळाची गरज – राहुल कुलकर्णी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
नवोदित संगीतकार व्हि आर ऋग्वेद व गायिका ऋचा कुलकर्णी यांचा पेशवा प्रतिष्ठान तर्फे सत्कार करण्यात आला.अंबाजोगाई चे भूमिपुत्र असलेल्या संगीतकार व्हि आर ऋग्वेद व गायिका ऋचा कुलकर्णी यांनी नुकतेच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपट अल्ल्याड पल्याड मध्ये संगीत व पार्श्वगायन दिलेले आहे. यानिमित्त दोन्ही बहीण भावंडांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राहुल कुलकर्णी बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून कमलाकर देशपांडे, प्रा.पी. व्ही. कुलकर्णी, प्रा रवींद्र पाठक, प्रा आर. वाय. कुलकर्णी, विभा कुलकर्णी यांची उपस्थिती होती… सत्काराला उत्तर देताना ऋचा कुलकर्णी म्हणाली की, लॉकडाऊन मध्ये सर्व जग ठप्प झाले होते, अश्यावेळी आम्ही वेळेचा सदुपयोग करून गायन व संगीत यावर भर दिला. एखाद्या चित्रपटात संगीत देणे ही फार मोठी उपलब्धि असल्याचे मत ऋग्वेद याने व्यक्त केले. पेशवा प्रतिष्ठान ने केलेल्या अश्या सत्कारामुळे मुलांना जिद्द आणि उमेद मिळते, ऋग्वेद व ऋचा यांच्या पुढील प्रवासाला दिलेल्या शुभेच्छा नक्कीच कामाला येतील असे मत ऋचा व ऋग्वेद यांचे वडील प्रा आर वाय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.यावेळी पेशवा प्रतिष्ठान चे पदाधिकारी डॉ महेश अकोलकर, डॉ संकेत तोरंबेकर, श्रीकांत जोशी , अक्षय देशमुख, राघव कुलकर्णी, पार्थ कांसुरकर सौ कल्याणी कुलकर्णी, रेणुका भालेराव, रोहिणी जड यांची उपस्थित होते.