लोकमान्य टिळक विद्यालयात ‘जागतिक योग दिन’ उत्साहात साजरा.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
दि.२१ जून २०२४ शुक्रवार रोजी पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयात ‘जागतिक योग दिन’उत्साहात साजरा करण्यात आला.
आजच्या धावपळीच्या युगात शारिरीक व मानसिक स्वास्थ्याची जोपासना करण्यासाठी योग अत्यंत महत्वाचे आहेत.या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात योगासने, ध्यानधारणा, प्राणायाम इ.योगप्रकार घेण्यात आले. सुरुवातीला अंबाजोगाई येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ चे प्रशिक्षक संजयराव कुलकर्णी व ॲड.वैजनाथराव पांडे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा पुस्तक भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. योग शिक्षक पांडे यांनी विद्यार्थ्यांना महर्षी पतंजली यांचे कार्य आणि योगशिक्षणाचे महत्व याबद्दल सविस्तर माहिती दिली.तसेच या वेळी संजय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे ध्यान,प्राणायाम,विविध बैठे आसने यांचे प्रात्याक्षिक घेतले. यात सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार,ओमकार, ध्यानधारणा,कपालभाती इ.प्रकारच्या योग प्रात्याक्षिकाचे त्यांनी सादरीकरण केले.सर्वांनी अत्यंत उत्साहात सहभाग नोंदवत या क्रियांचा आनंद घेतला.
जागतिक योग दिनानिमित्त विद्यालयात दि.२१ जून ते २७ जून दरम्यान ‘योगसप्ताह’ चे आयोजन देखील करण्यात आले आहे.
कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयराव विभूते यांनी विद्यार्थ्यांना अध्ययन करताना योगसाधना किती महत्वाची आहे याची माहिती देत योग आणि शालेय अभ्यास या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. सदरील कार्यक्रमात मुख्याध्यापक संजयराव विभूते तसेच क्रीडा शिक्षक ज्ञानेश मातेकर,सहशिक्षक विष्णू तेलंगे,नितीन चौधरी,राकेश मोरे,कार्यालय प्रमुख प्रकाश बोराडे,सेवक माणिक तेलंग,आनंद देशपांडे व सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला.