मंद्रूप मध्ये कारहूनवी सण मोठ्या उत्साहात साजरा*करण्यात आला.
सोलापूर : सालाबादाप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचा राजा “बैलजोड्यांची” विधिवत पूजा करण्यात आली. तत्पूर्वी सर्व बैलजोड्याना सजवून सवाद्य व बाजार पेठ मेन रोड गावातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मंद्रूप बाजारात पेठ शिव -बसव चैकात सुरुवात करण्यात आले.तर मिरवणूक मार्गावर मानाच्या बैलजोड्या जागोजागी गावातील माता-भगिनींकडून आरती करण्यात आली.
हा कारहुणवी सणाचा हा सण मंद्रूप सर्व शेतकरी बांधव व मंद्रूप मधील शेतकरी वर्ग मोठ्या उत्साहात साजरा करतात . मिरवणुकीमध्ये मंद्रूप मधील सर्व वाड्यावस्तीवरील शेतकरी आपापले बैल जोडी मोठ्या संख्येने सहभागी होतात.
या मानाच्या मिरवणुकीमध्ये मंद्रूप गावचे हर्षवर्धन देशमुख, युवा उद्योजक मळसिध्द मुगळे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे, दानेश शेख, आप्पाशा टेळे , खंडु वाघमाडे ,श्रीशैल लोभे , इम्रान मुल्ला, आप्पासाहेब व्हनमाने, प्रदीप ख्याडे ,विलास शेंडगे ,संतोष टेळे यांच्यासह मंद्रूप व परिसरातील सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी शिवराज मुगळे सोलापूर)