कामगार मालक अंशदान भरण्याचे आवाहन
अंबाजोगाई : (वार्ताहर)
महाराष्ट्र कामगार कल्याण निधि अधिनियम १९५३ च्या कलम ६(ब) मध्ये झालेल्या सुधारनेनुसार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे कामगार मालक अंशदानाचा भरणा करण्याचे आवाहन कामगार कल्याण आयुक्त रविराज ईळवे यांच्यकडून करण्यात आले आहे .
या अधिनियमात मार्च २०२४ मध्ये झालेल्या सुधारनेनुसार जून २०२४ पासुन कामगार अंशदानाचे दर रू. २५ आणि मालक अंशदानाचे दर रू. ७५ झाले आहेत . महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या www. public.mlwb.in या संकेतस्थळावर है अंशदान ऑनलाइन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या व ५ किंवा त्यापेक्षा अधिक कामगार / कर्मचारी असलेल्या सर्व उद्योग, कंपन्या , कारखाने,बॅंका , व्यापारी संस्था , हाॅटेल्स ,रेस्टॉरंट , हॉस्पिटल्स, ट्रांसपोर्ट कंपन्या, टूर्स आणि ट्रॅव्हल्स, मॉल्स , वर्कशॉप,मंडळे ,महामंडळे केंद्र व राज्य शासनाचे अंगीकृत उद्योग यांना हा अधिनियम लागू आहे. आस्थापनेत कार्यरत नियमित , हंगामी ,कंत्राटी कामगार अथवा कर्मचार्यांच्या वेतनातुन दर सहा महिन्यांनी जून व डिसेंबर मध्ये अंशदान कंपात करुन ते मंडळाकडे भरणा करणे कायद्याने बंधनकारक आहे. मंडळाकडे जमा होणाऱ्या निधीतुन कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध कल्याणकारी योजना , उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात येतात.