शेतीच्या वादातून जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करणाऱ्या इसमांनवर कठोर कारवाई करण्याची मागणी.
परभणी :जिल्हाधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जिंतूर तालुक्यात असलेल्या लिंबाळा गावातील रहिवाशी शोभाबाई खंदारे, प्रेमानंद खंदारे, वैशाली खंदारे यांनी निवेदन सादर केले आहे . सदरील निवेदन असे नमूद करण्यात आले आहे की पोलीस स्टेशन जिंतूर येथे शेतीच्या वादातून आमच्यावर झालेल्या जीवघेणे मारहाणीच्या संदर्भात आम्ही जिंतूर पोलीस स्टेशन तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता आमची फक्त NC दाखल करण्यात आली त्यावर अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.
शेतामध्ये काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या हे खंदारे कुटुंब यांना आरोपी यांच्याकडून शेतात पाय टाकाल तर जीवे मारून अशा प्रकारच्या धमक्या देण्यात येत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी शेतातील उभे पीक सुद्धा या आरोपीने कापून नेले त्यामुळे यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण तर केलीच व शेतातील राहण्यासाठी असणारे झोपडी जाळून टाकले त्यातील संसार उपयोगी साहित्य सुद्धा जाळून टाकण्यात आले .अत्यंत भयभीत आणि दहशतीखाली जीवन जगत असणारे हे फिर्यादी सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. जिल्हा प्रशासनाकडे न्याय मिळावा अशी माफक अपेक्षा व्यक्त करत आहेत आरोपीला लवकरात लवकर कठोर कारवाई करावी असे त्यांनी निवेदनही दिले आहे.
प्रतिनिधी राहुल वाहीवळ परभणी