सचिन विधाटे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील भेट
भेटी दरम्यान केली विविध विषयांवर चर्चा
गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा सर्कलचे सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील विधाते यांनी गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे सकल मराठा समाजाचे कार्यशील नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
भेटीदरम्यान समाजातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. जरांगे पाटील समाजासाठी करत असलेल्या आंदोलनास मराठा समाज कायम सोबत असेल व दादांचे ऋणी असेल व सदैव पाठींबा राहिल असे सचिन पाटील यांनी बोलतांना सांगितले.
तसेच आई जगदंबेच्या आशीर्वादाने आपण करत असलेले आंदोलनास नक्कीच यश येईलच अशी चर्चा यावेळी झाली. या भेटी प्रसंगी श्री सचिन पाटील, विवेक विधाटे, कार्तिक विधाटे, रोहित पाटील, हनुमान देशमुख, तेजस आदमाने, अथर्व काळुसे, आदींसह सचिन विधाटे मित्र परिवार उपस्थित होते.
(प्रतिनिधीःविशाल जोशी गंगापूर)