व्हाॅईस ऑफ मीडियाच्या अध्यक्षपदी भास्कर लांडे पालम तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड
पालम – व्हाॅईस ऑफ मीडिया संघटनेच्या पालम तालुकाध्यक्षपदी भास्कर लांडे तर कार्याध्यक्षपदी मारोती नाईकवाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व कार्यकारणीची निवड करून नुतन पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता.22) पालम शहरात संघटनेची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण, परभणी शहर उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, साप्ताहिक विंगचे कार्याध्यक्ष अरूण रनखांबे, उपाध्यक्ष संग्राम खेडकर, पालम सिटीजन्सचे संपादक गौसोद्दीन शेख उपस्थित होते. बैठकीत नवीन कार्यकारणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या सरचिटणीसपदी शिवाजी शिंदे, सहसरचिटणीस गुणवंत सराफ, उपाध्यक्ष चाँद तांबोळी, कोषाध्यक्ष अवधूत जाधव, कार्यवाहक धोंडीराम कळंबे, प्रवक्ते अंबादास ठाकूर, संघटक भगवान करंजे, प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब फुलपगार, मार्गदर्शक माधवराव गायकवाड, मोतीराम शिंदे, लक्ष्मण दुधाटे, वैजनाथ हत्तीअंबीरे तर सदस्यपदी गोविंद सोलेवाड, रूखमाजी गिनगीने, सिद्धार्थ पोले, संभाजी भुजबळ, ओमकार बहिरवाड, माधव हनवते, बळीराम येवले, कल्याण सिरस्कर, शेषेराव सोपने, संभाजी शिराळे, प्रल्हाद पांचाळ, गजानन जाधव, अंकुश वाघमारे यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
फोटोओळी : व्हाॅईस ऑफ मीडिया संघटनेच्या पालम तालुका पदाधिका-यांच्या सत्काराप्रसंगी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, कार्याध्यक्ष कैलास चव्हाण, परभणी शहर उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, साप्ताहिक विंगचे कार्याध्यक्ष अरूण रनखांबे, उपाध्यक्ष संग्राम खेडकर, पालम सिटीजन्सचे संपादक गौसोद्दीन यांच्यासह आदी.
अंकुश वाघमारे न्यूज 24 टुडे परभणी पालम