अहमदनगर शहरात दहशत निर्माण करणारा खरा सूत्रधार कुणाल भंडारीच आहे का ?
एकेकाळी एकोप्याने गुण्या गोविंदाने शांततेत राहणाऱ्या अहमदनगरला कोणाची नजर लागली ?
अहमदनगर : गुन्हेगारीत अतिसंवेदनशील असलेल्या अहमदनगर शहरात अलीकडील काळात काही समाज कंटकांकडून गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. हे कृत्य करणाऱ्यांची इतकी मजल गेली आहे की आता एकाच दिवशी अनेक गंभीर गुन्हे घडवून आणले गेले आणि या घटनेने अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. गेल्या एक दीड वर्षांपासून अहमदनगर मध्ये अनेक गुन्हे आणि गुन्हेगार वाढले असून यामुळे शहराचे वातावरण गढूळ झालय.
नगर शहर आणि जिल्ह्यात गेल्या एक दीड वर्षांत सुरुवातीला महिन्यातून एक दोन गंभीर घटना त्यात दोन गटात वाद , हाणामाऱ्या आणि जीवे ठार मारण्याच्या हेतूने जीवघेणे हल्ले होत असायचे आणि यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे, पण हे प्रकार पोलिसांनी गांभीर्याने घेतले नसल्याने घटना वाढत गेल्या…आणि महिन्यातून एक दोन होणाऱ्या घटना वाढत जाऊन शहरात दररोजच गैरप्रकार एकमेकांच्या जीवावर उठणाऱ्या मारहाणीच्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटना घडू लागल्या, पण तरीही आरोपींवर कठोर कारवाई होत नसल्याने आरोपींचे धाडस वाढत गेले आणि याचा परिणाम म्हणजे या आरोपींनी आपल्या साथीदारांना सोबत घेत टोळ्या बनवत शहरात धुडगूस घालत प्राणघातक हल्ले किंवा शहराचे वातावरण बिघडेल असे कृत्य करू लागले, आणि दररोज एखादी घटना घडत होती, पण अहमदनगर शहरात १८ जून रोजी एकाच दिवशी एका जमावाने मोठी दहशत माजवत विविध गंभीर गुन्हे घडवून आणले आणि या जमावात बजरंग दलाचा कुणाल भंडारी याचा देखील समावेश आहे,
कुणाल भंडारी आणि त्याच्या अनेक साथीदारांनी रामवाडी परिसरात रात्रीच्या वेळी हातात लाकडी दांडके घेऊन दुचाकींवरून जाऊन मोठ्याने घोषणाबाजी केली दरम्यान रस्त्यावर काचेच्या बाटल्या फोडल्या, दिल्लीगेट परिसरातील मशिदीवर, चितळे रोडवरील दर्ग्यावर दगडफेक केली, नंतर रात्री पाईप लाईन रोड येथील फाईव्ह स्टार बेकरीत झोपलेल्या कामगारांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केला यात तीन कामगार गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार चालू आहे तर त्यात एक जण चिंताजनक आहे,
मात्र कुणाल भंडारीच्या या टोळीने नेमकं हे कृत्य का केले ? शहराची शांतता भंग करून कुणाल भंडारीने नेमकं काय साध्य केले, त्या बेकरीतील कामगारांना संपवण्याचे कट कारस्थान त्या दहशत माजवणाऱ्या टोळीने का केले ? कोणाच्या सांगण्यावरून केले, शहराचे वातावरण दूषित करण्यामागचा मुख्य सूत्रधार हा कुणाल भंडारीच आहे का ? असे प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच शहरात एकाच दिवशी अनेक गंभीर गुन्हे घडल्यावर पोलिसांनी त्याला एका गुन्ह्या प्रकरणी ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले त्याला जामीन पण मिळाला मात्र इतर गुन्ह्यात त्याला संशयित म्हणून पोलीस ताब्यात घेण्याआधीच तो कुणाल भंडारी का पसार झाला ? त्याला नेमकी भीती कशाची होती ? तसेच नगर शहरात एकाच दिवशी इतक्या घटना घडतात मग पोलीस प्रशासन काय करत आहे, तसेच या घटनेतील कुणाल भंडारीला पोलिसांचा तर वरदहस्त नाही ना ? न्यायालयातून पसार झालेला कुणाल भंडारीला पोलीस ताब्यात घेतील का ? संबंधित घटनेचा मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचतील का ? या गंभीर घटनांचा पोलीस योग्य तपास करतील का ? कुणाल भंडारीला असे कृत्य करण्यासाठी कोणत्या राजकीय मंडळींचे पाठबळ मिळत आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
एकंदरीतच अहमदनगर शहरात शांतता अबाधित राहिलेली आणि सर्व नगरकर एकोप्याने गुण्या गोविंदाने राहत असताना एक दीड वर्षात या अहमदनगरला कोणाची नजर लागली असा मोठा प्रश्न नगरकरांना पडलाय.
संपादक : आफताब शेख