Close Menu
    What's Hot

    Nilesh lanke : जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत एटीएम व सोनेतारण सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न : खा.लंके

    November 16, 2026

    नगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भे

    November 15, 2026

    Akshay kardile : निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

    November 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»Sangram jagtap | आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला मोठे यश…
    Ahmednagar

    Sangram jagtap | आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला मोठे यश…

    newstoday24By newstoday24June 25, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

    जिल्हा क्रीडा संकुलासाठी ५१ कोटींचा निधी मंजूर / पहिल्या टप्प्यातील १५.५ कोटींच्या निधीला मान्यता

    अहमदनगर – नगर शहरातील वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी खेळाची मैदाने तयार करणे, दुरुस्ती करणे, इनडोअर गेमच्या हॉलची दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने ५१ कोटी १७ लाख २५ हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यातील १५ कोटी ६९ लाख ५२ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दुसर्‍या टप्प्यात ३५ कोटी ४७ लाख ७३ हजार रुपयांच्या निधी मिळणार मिळणार आहे. या निधीमुळे जिल्हा क्रीडा संकुलाचे रुपडे पालटणार असल्याची माहिती आ.संग्राम जगताप यांनी केली.

    याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य या विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी या संदर्भात परिपत्रक काढले आहे. नगरमध्ये भव्य जिल्हा क्रीडा संकुल उभरण्यात आले आहे. परंतु तेथे पुरेशा सुविधा नाहीत. क्रीडा प्रेमी व विविध संघटनांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सुविधा देण्यासाठी मागणी केली होती. त्याची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून जिल्हा क्रीडा संकुलासाठी ५१ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात १५ कोटी ६९ लाख ५२ हजार रुपये निधी मिळणार आहे. त्यामध्ये ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक, क्रिकेट ग्राउंड लॉन, स्टेडियम करिता स्प्रिंकलर सिस्टीम करणे, कबड्डी, खो खो, बास्केट बॉल, व्हॉलिबॉल मैदानांचे डोम रूफ, ग्राउंड व इतर बाबींचा समावेश आहे.

    दुसर्‍या टप्प्यामध्ये ३५ कोटी ४७ लाख ७३ हजार रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये स्टेडियममधील प्रेक्षक गॅलरीस रूफिंग करणे, स्वच्छतागृह दुरुस्ती, रेनवॉटर, बॅडमिंटन हॉल, अद्ययावतीकरण, वुडन फ्लोरिंग करणे, स्वच्छतागृह, सोना व स्टीम बाथ व्यवस्था, ऑकेस्टिक व्यवस्था, वसतिगृह (दुसरा मजला बांधकाम, पेव्हर ब्लॉक संपूर्ण इमारत, रुममधील अंतर्गत कामे, जलतरण तलाव अद्ययावतीकरण, फिल्ट्ररेशन प्लांट दुरुस्ती, वेट जीम ट्रेनिंग हॉल, स्वच्छतागृह, अंतर्गत व बाह्य रंगरंगोटी, प्रेक्षक गॅलरी रूफिंग, पार्किंग एरियामध्ये पेव्हर ब्लॉक, टू व फोर व्हिलर पार्किंग शेड करणे, स्वागत कक्ष अंतर्गत कामे, कुस्ती व बॉसिंग हॉल बांधकाम, कुस्ती तालीम अद्ययावतीकरण व नवनिर्मिती, दुमजली बांधकाम तळमजला कुस्ती हौद, पहिला मजला कुस्ती मॅट हॉल, दुसरा मजला बॉसिंग हॉल, कबड्डी व खोखो मैदानांचे अद्ययावतीकरण, डोम रूफ व स्वच्छतागृह बांधकाम, दोन सिंथेटिक टेनिस कोर्ट तयार करणे, सीसी रोड, एन वॉटर गटार व्यवस्था, विद्युतीकरण अंतर्गत व बाह्य, ड्रेनेजलाइन व्यवस्था, पाणीलाइन व्यवसथा, रुफ टॉप सोलन पॅनल व्यवस्था, स्टेडियम, बॅडमिंटन हॉल, वसतिगृह, जलतरण तलाव, कुस्ती हॉल आदींचा समावेश आहे. राज्य सरकारकडे आमदार जगताप यांनी केलेल्या मागणीला मोठे यश आले असून निधी मिळाल्यानंतर जिल्हा क्रीडा संकुलाचे रुपडे पलटणार  असल्याचे ते म्हणाले.

    #ahmednagar #sangramjagtap #newstoday24ahmednagar
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous ArticleSpecial report | अहमदनगर शहरात दहशत निर्माण करणारा खरा सूत्रधार कुणाल भंडारीच आहे का ? 
    Next Article प्राचार्य राजाभाऊ धाट सहस्त्रचंद्र दर्शन समारोहाचे ३० जुन रोजी आयोजन
    newstoday24
    • Website
    • Tumblr

    Related Posts

    नगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भे

    November 15, 2026

    Akshay kardile : निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

    November 14, 2026

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.