Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार माजी प्राचार्य तथा शिक्षण तज्ञ डॉ दादाहरी कांबळे यांना जाहीर
    Maharashtra

    रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार माजी प्राचार्य तथा शिक्षण तज्ञ डॉ दादाहरी कांबळे यांना जाहीर

    newstoday24By newstoday24June 26, 2024Updated:June 26, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार माजी प्राचार्य तथा शिक्षण तज्ञ डॉ दादाहरी कांबळे यांना जाहीर

    अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-
    अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरी पुरोगामी विचारधारनेणे प्रेरित होऊन मा.रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठान, अंबाजोगाई जि.बीड ही संस्था कार्यरत आहे.आंबेडकरी चळवळीतील तत्वनिष्ठ आधारस्तंभ स्मृतिशेष रामचंद्र इंगळे (अप्पा )यांनी कर्तृत्त्वसंपन्न जिल्हा परिषद सदस्य (बीड ) म्हणून राजकीय,सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांचे कार्य दिशादर्शक आणि दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशमान आहे. स्मृतिशेष रामचंद्र इंगळे (अप्पा ) यांच्या वैचारिक भूमिकेची शिदोरी घेऊन कार्यरत असणाऱ्या व्यक्ती व संस्थेची दखल घेऊन त्यांना मा.रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. या सामाजिक सेवा प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी दिल्या जाणारा मा.रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार-२०२४ हा सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, आदर्श शिक्षक, समाजभूषण माजी प्राचार्य डॉ .दादाहरी कांबळे यांना देवून गौरवण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.सिद्धार्थ तायडे,उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.रमेश इंगोले , संस्थापक- सचिव बालासाहेब इंगळे यांनी जाहीर केला आहे.हा पुरस्कार शुक्रवार दि 28 जून 2024 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे.
    या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मा.राजकिशोर (पापा) मोदी (श्री.बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-सचिव तथा माजी नगराध्यक्ष अंबाजोगाई ) तसेच ज्येष्ठ नेते ॲड.अनंतराव जगतकर, प्राचार्य डॉ डी एच थोरात, डी.जी.धाकडे ,ॲड.श्याम तांगडे, प्रा.व्ही.बी.चव्हाण, डॉ.मधुकर कांबळे, सी.व्ही.गायकवाड, महादेव आदमाने, एस.जी.गुळभिले,भारत सातपुते,ताराचंद शिंदे, संतोष शिंनगारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक-शैक्षणिक-सांस्कृतिक-राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील सामाजिक योगदान देणाऱ्या,निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्तीस अथवा सामाजिक संस्थांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने २०१९ पासून हा पुरस्कार देण्याचे कार्यान्वीत केले आहे.२०१९ मध्ये आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते स्मृतिशेष एन. के.सरवदे (आप्पा) यांना तर २०२० मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भानुदासजी देवरवाडे,२०२१मध्ये वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणारे डॉ.मधुकर कांबळे,२०२२ मध्ये ज्येष्ठ भीमगीत गायक नागनाथ जोगदंड,२०२३ मध्ये सहकार व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अल्पसंख्याकांचे हितचिंतक समृत्तिशेष ख्वाजा बशीरोद्दिन ख्वाजा मोइनोद्दीन यांना प्रदान करण्यात आलेला आहे. २०२४ सालचा पुरस्कार ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राचार्य डॉ.दादाहरी कांबळे यांना मान्यवरांच्या हस्ते मा.रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार शुक्रवार दि.२८ जून २०२४ रोजी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन, अंबाजोगाई येथे सकाळी साडे दहा वाजता प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सर्वांनी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.सिद्धार्थ तायडे,उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.रमेश इंगोले , संस्थापक सचिव बालासाहेब इंगळे तथा पदाधिकारी प्रा.कमलाकर इंगळे ,बळीराम जोगदंड ,ब्रिजेश इंगळे,दादासाहेब कसबे,रानबा गायकवाड, बा. सो. कांबळे,विकास वाघमारे,प्रा.शंकर सिनगारे,डॉ.बबन मस्के, शालन जोगदंड,रवींद्र देवरवाडे, दिलीप साठे ,प्रा.बी.एम.खरात,जीवनराव घाडगे,व्यंकट वाघमारे,केवळबाई इंगळे, वंदना इंगळे,जयश्री सिरसाट,धम्मानंद कांबळे, करुणाताई कांबळे, कांताबाई बनसोडे, प्रा.उषा कांबळे, आम्रपाली इंगळे, डॉ.भारती सोनवणे, स्वीतम इंगळे, रोहन इंगळे, विजय इंगळे,मिलिंद इंगळे आदींनी केले आहे.

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleप्राचार्य राजाभाऊ धाट सहस्त्रचंद्र दर्शन समारोहाचे ३० जुन रोजी आयोजन
    Next Article उप अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालयांच्या शेतीच्या चुकीच्या मोजणी मुळे शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीने घाव घालुन एकास जख्मी तर दोघे गंभीर जख्मी
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.