उप अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालयांच्या शेतीच्या चुकीच्या मोजणी मुळे शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीने घाव घालुन एकास जख्मी तर दोघे गंभीर जख्मी
जिवित्वाला धोका आहे म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सुद्धा फायटर काठी व कुऱ्हाडीने डोक्यात जब्बर घाव पोलीसांची बघ्यांची भुमिका संस्यास्पद
काही महिन्या अगोदर मांडवा शेत शिवरामध्ये उप अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय येथील पांडे या अधिकाऱ्याने नोटिस न देताच शेताची मोजणी केली परंतु ही शेताची मोजणी मान्य नसल्या कारणाने तुळशीराम पुसांडे यांच्यासह तिघांनी पोलीस स्टेशन दिग्रस येथे तक्रार दाखल केली होती परंतु तिथेही त्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी न्यायालय गाठुन फौजदारी कारवाई साठी अर्ज दखल केला होता
याचाच राग म्हणात धरून गैर अर्जदारांनी काही गुंडांना आणुन अचानक पने एकाएकी तिघांनाही काठी फायटर व कुऱ्हाडीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेमध्ये दोघे अत्यंत गंभीर जख्मी तर एक जख्मी झाला आहे सूत्रांच्या माहितीनुसार माहिती मिळे पर्यन्त कोणत्याही गुन्ह्याची नोंद घेण्यात आली नाही