डी वाय एफ आय व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश
अंबाजोगाई (प्रतिनिधि):-
“स्वाराती”ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालय येथील कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय म्हणून रुग्णालय परिसरात निवासस्थाने उभारण्यात आले आहे. ती दुरुस्त करून देण्याच्या मागणीसाठी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर आज धरणे आंदोलने करण्यात आले. सदरील आंदोलनाला यश आले असून महिनाभरात सर्व कामे करून देण्याचे लेखी आश्वासन संबंधित विभागामार्फत देण्यात आले. त्यामुळे सदरील आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांच्या कार्यालय समोर कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी आंदोलनात बसली होते. यावेळी बांधकाम विभागाच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आले. महिनाभरामध्ये सर्व कामे करून देण्यात येतील. मागील दोन वर्षांमध्ये जे काम झाले आहेत त्यामध्ये ज्या तुरटी आढळतील त्या दुरुस्त करून देण्यात येतील व जी कामे झाली आहे त्यांच्या प्रमाआठ दिवसात उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. व ड्रेनेज दरवाजे खिडक्या किंवा अत्यावश्यक जी कामे आहेत ते तात्काळ सुरू करण्यात येतील असे देखील आश्वासन दिल्यामुळे सदरील आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र महिनाभरात जर दुरुस्ती झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यावेळी देण्यात आला. यावेळी डी वाय एफ आय चे जिल्हा उपाध्यक्ष सुहास चंदनशीव, तालुकाध्यक्ष देविदास जाधव तालुका सचिव प्रशांत मस्के, पत्रकार संतोष केंद्रे, सिद्राम सोळंके, मुंजाहरी नवगिरे, स्वप्निल ओव्हाळ, दशरथ घुले, अशोक मोराळे, शेळवणे, जगन्नाथ पाटोळे,वागमारे,राऊत आधी या वेळी उपस्थित होते.