पालम येथे शिवनेरी महाविद्यालयाचा वर्धापन दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
शिवनेरी महाविद्यालय पालम चा वर्धापन दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.प्रा.डॉ.एस.व्ही.शेटे सर हे होते तर उद्घाटक म्हणून पालम नगरपंचायतचे नगराध्यक्ष मा.वसंत काका सिरस्कर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून पालम पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा. मुंढे साहेब व आमलदार मोरे साहेब हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत समारंभानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवनेरी कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य आर. सी. घोगरे यांनी केले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महाविद्यालयातून प्रथम , द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थांना पुस्तके व पुष्प देऊन तर विशेष प्राविण्यासह मध्ये पास विद्यार्थांना पेन तर महाविद्यालयातून चांगल्या मार्काने पास होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थांचा प्रमाण पत्र , प्रोव्हिजनल डिग्री, पुष्प व एक मानचिन्ह देऊन यथेच्छ असा सत्कार महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आला. हा महाविद्यालयाचा वर्धापन व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा शिवनेरी महाविद्यालय पालम व शिवनेरी कनिष्ट महाविद्यालय पालमच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. यावेळी शिवनेरी महाविद्यालय पालमचे प्र. प्राचार्य आर.बी भस्के सर यांनी विद्यार्थांस सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डी.आर.तोंडारे सर , प्रा.आर ई. गायकवाड सर यांनी केले तर आभार प्रा.एस.व्ही.सोनटक्के सर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सेवक यांनी परिश्रम घेतले.
अंकुश वाघमारे न्यूज टुडे 24 परभणी पालम