मुख्याध्यापक उन्मेष मातेकर यांचा सेवापुर्ती सोहळा
अंबाजोगाई -: समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यावर्धिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक उन्मेष मातेकर हे सेवानिवृत्त होत असून या निमित्ताने सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य रा.गो.धाट सर, प्रमुख अतिथी म्हणून भा शि प्र संस्थेचे माजी कार्यवाह डॉ शरद हेबाळकर,शरयु हेबाळकर, वसंतराव देशमुख , औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे,परळीचे तहसीलदार व्यंकट मुंडे, संस्थेचे अध्यक्ष एस एस कोळगे, सचिव पी जी ईटके, उपाध्यक्ष एस बी भिंगोरे, कोषाध्यक्ष पी जे पैंजणे, स्वामी विवेकानंद वाचनालयाचे अध्यक्ष एम टी मुंडे ,उन्मेष मातेकर, अंजली मातेकर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना माजी प्राचार्य धाट म्हणाले की, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा विद्यार्थी व संघ परिवाराच्या मुशित घडलेला स्वयंसेवक कार्यकर्ता एक शिक्षण संस्था यशस्वीपणे चालवू शकतो याचा मला सार्थ अभिमान वाटतो.त्याचे उत्तम उदाहरण मातेकरांनी घालून दिले आहे.शाळा चालविणे हि सोपी गोष्ट नाही. संस्थाचालक पालक सर्व शिक्षक सहकारी,व विद्यार्थी यांच्या मदतीशिवाय शिक्षण संस्था चालवणे अतिशय अवघड आहे. सर्वांच्या सहकार्यानेच संस्था पुढे जात असते. आदर्श देशभक्त विद्यार्थी घडविण्याचे कार्य फक्त शिक्षकच करू शकतात या मतावर मी ठाम असून सर्व शाळांमधून संस्काराचे आणि देशभक्तीचे संस्कार शिक्षकांनी करावेत असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी बोलताना डॉ शरद हेबाळकर म्हणाले की, संघाच्या शाखेमध्ये घडलेला स्वयंसेवक उत्तम पद्धतीने एक शाळा चालवू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे मातेकर आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शिक्षकच विद्यार्थ्यांना सुसंस्कार घडवून आदर्श देशभक्त नागरिक समाज घडवू शकतो. याप्रसंगी मुख्य अभियंता सुनील इंगळे,एम टी मुंडे,माजी विद्यार्थी अमृत दरगड ,डॉ गणेश सावजी, शिक्षक प्रतिनिधी हंगरगे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश्वर निला यांनी तर संचालन वैशाली जोशी, तर आभार नम्रता पैंजणे यांनी मानले.
यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, दत्ताप्पा ईटके गुरुजी,ऍड राजेश्वर देशमुख,विष्णुपंत
कुलकर्णी,श्री श्रीराम पोरवाल,श्री बाळासाहेब कुलकर्णी,श्री तोष्णीवाल डॉ दीपक पाठक, अंबाजोगाई येथून श्री खोलेश्वर प्रा विद्यालयाचे मु अ श्री अप्पा यादव, सहशिक्षक श्री मनोज बरुरे,श्री राजुरकर,सेवाभारतीचे कार्यवाह श्री कौस्तुभ कोदरकर,श्री प्रकाश जोशी श्री अशोक जोशी,संजय कुलकर्णी , पत्रकार श्री धीरज जंगले,श्री जुजगर,पालक, सेवानिवृत्त शिक्षक श्री आर आर कांबळे ,माजी विद्यार्थी डॉ रोहित काकाणी तसेच मातेकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शिक्षक आघाडीचे शहराध्यक्ष अजय जोशी विद्यावर्धिनी विद्यालयाचे व विवेकवर्धिनी विद्यालयाचे शिक्षक वर्ग उपस्थित होते.