पंजाब कडून नांदेडला जात असताना इनोव्हा ची ट्रकला धडक , ४ भाविकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू.
यवतमाळ : पंजाब कडून नांदेडला जात असताना इनोव्हा ची ट्रकला धडक झाली. या अपघातात ४ भाविकांचा जागीच मृत्यू.झाल्याची दुर्दैवी घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे झाली .यात एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे . त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते .
पंजाबमधून नांदेड येथे काही भाविक गुरुद्वारा दर्शनाकरिता इनोव्हा या गाडीने निघाले . नागपूर ….तुळजापूर या महामार्गावर कळम्ब जवळ या इनोवानी ट्रकला धडक दिली . आज सकाळची पावणेसहा ची घटना असल्याचे सांगितले जाते . अपघात इतका भीषण होता की इनोव्हा गाडी ही अक्षरश ट्रक च्या मागच्या भागात जाऊन अडकून पडली आणि सुरक्षेच्या दृष्टीने लावलेल्या एअर बॅग्स च्या सुद्धा चिंधड्या झाल्यात .कळंब पोलीस स्थानकाच्या निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली .या घटनेत २ पुरुष आणि २ महिलांचा जागीच मृत्यू झाला. मदतीसाठी गावकरी पुढे सरसावले . इनोव्हा कार मधील एका जणांची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती केले आहे .