रिंगणातील आश्वाच्या धडकेने एकाचा मृत्यू : माऊलींच्या सोहळ्यात दुर्घटनेचे गालबोट
नातेपुते : दि.११ जुलै रोजी श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नातेपुते येथे झाला माऊलींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत केले गेले जेसीबी तून माऊलींच्या पालखीवर फुलांची उधळण करण्यात आली तसेच पोलिस प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने आणि नातेपुते नगरपंचायतीच्या वतीने वारकऱ्यांची व्यवस्था चोख बजावली दि.१२जुलै रोजी पालखी नातेपुते हुन माळशिरस मुक्कामी सकाळी मार्गस्थ झाली सदाशिवनगर येथील पुरंदावडे गावी माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहीले गोल रिंगण होते या दरम्यान रिंगण सुरू असताना पुढील आश्वाच्या गळ्यातील पट्ट्यात मागील आश्वाचा पाय अडकल्याने तो आश्व रिंगणा समोर बसलेल्या लोकांच्या अंगावर पडला यात वारकरी आणि भक्तमध्ये बसलेले फोटो ग्राफर कल्याण चटोपाध्याय (वयवर्ष ४८रा.मिताली अपार्टमेंट पश्चिम बंगाल कलकत्ता) या अपघातात जखमी झाले यांना तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले पणं उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला