संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे यांच्या पालखीचे नातेपुते येथे आगमन
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे यांच्या पालखीचे 11 जुलै रोजी नातेपुते येथे आगमन होत आहे. यानिमित्त माऊलीच्या पालखी तळावरील विश्रामासाठीच्या शामियाना फुलांच्या आरसाने सजवण्याची तयारी सुरू होत आहे. श्रीमंत शितोळे सरकारांच्या मालकीचा श्री माऊलीच्या विश्रामासाठीच्या शामियानास फुलांची आरास व माऊलीच्या अश्वानसाठी फुलांची झुल तयार केली जाते. पालखी दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत अंतर बाह्य फुलांची आरास करून शामियाना तयार ठेवला जातो. आतील बाजूस जास्तीत जास्त मोगऱ्यांच्या फुलांचा वापर केला जातो. फुलांच्या माध्यमातून पालखीचा कट्टा सजवला जातो बाहेरील बाजूस फुलांची कमान केली जाते. माऊलीच्या शामियानाप्रयन्त फुलांच्या आकर्षक पायघड्या घातल्या जातात. या य सर्व कार्यासाठी नातेपुते येथील स्वामी विवेकानंद गणेश उत्सव मंडळ तसेच दत्तात्रय कर्चे, दीपक पिसे, गणेश उराडे ,धनंजय गरगडे ,सागर पोटे, श्रीराम आर्ट्स ,उमेश कुचेकर, विवेक राऊत, सागर जाधव यांच्या माध्यमातून स्वखर्चाने माऊलीची सेवा केली जाते. यासाठी हे सर्वजण पालखी मुक्कामाच्या अगोदर स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन योग्य अशा फुलांची पाहणी करून ती खरेदी केली जातात हे कार्य गेली तीन वर्ष ते करत आहेत.