इंटरनॅशनल हुमान राइट्स कौन्सिल परभणी यांच्या वतीने मागील सात दिवसापासून आमरण उपोषण सुरू
सात दिवस झाले तरी जिल्हा प्रशासनाकडून अद्याप दखल नाही
परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यकारी कार्यालय समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदान येथे मागच्या सात दिवसापासून इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स कौन्सिल परभणी शाखा यांच्या वतीने दिनांक आठ जुलैपासून विविध शासकीय कार्यालयाचा भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आलेला आहे आज तब्बल सात दिवस झाले असून जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही सुभेदार नगर येथील बळकवलेली जमीन आणि त्यावरती खोट्या रजिस्ट्रिया नोटरी करून नागरिकांना विक्री करण्याचा जो घाट घातलेला आहे तो अतिशय गंभीर स्वरूपाचा असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या सामाजिक संघटनेच्या वतीने लावून देण्यात आलेली आहे परभणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण यांच्या माध्यमातून 60 सागवण्याची झाडे आणि पाच आंब्याची झाडे तोडून त्याची विल्हेवाट लावण्याचा सुद्धा आरोप ह्यूमन राइट्स कौन्सिल या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्याच बरोबर येथील जायकवाडी विभाग 10 या अभियंता यांची हकालपट्टी करण्यात यावी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता यांची हकालपट्टी करण्यात यावी, परभणी शहर महानगरपालिका अतिक्रमण विभाग प्रमुखांची हकालपट्टी करण्यात यावी, माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विभागणी निहाय संयुक्त मोजणी करून शासनाची जमीन शासनाच्या ताब्यात घ्यावी ,सदरील मागणीच्या संदर्भात ह्यूमन राइट या संघटनेकडून आंदोलन मागच्या सात दिवसापासून सुरू आहे . या उपोषणात राजू सखारामजी वानरे ,सत्तार खान नूरखान, यशवंत भीमराव सोनवणे, वाजिद खान जहांगीरखान हे आंदोलन करत असून अध्यापही जिल्हा प्रशासनाने दखल घेतलेली नाही. लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्तालयाच्या समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
प्रतिनिधी राहुल वाहीवळ परभणी