शहीद जवान सतीश पेहरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी तालुक्यातुन अनेकांची जालन्यामधील वरुड बु. या स्मारकांच्या ठिकाणी ऊपस्थीती पहायला मिळाली. तीन ही मुले देशसेवाकरीत असतांना एकाला विरमरण आल.होत
जालना जिल्हातील जाफ्राबाद तालुक्यात मधील वरुड बु. येथील असलेले शहीद जवान सतीश पेहरे हे भारतमातेचे रक्षण करत असतांना त्यांना 14 जुलै 2020 रोजी वीरमरण आले. त्यांच्या या स्मृतीदिनानिमित्त स्मारकावर वीर माता अलकाबाई पेहरे,वीर पिता सुरेश पेहरे ,वीर पत्नी जया व मुलगा त्यांचे भाऊ अनिल पेहरे कुटुंबीया समवेत ऊपस्थीत होते.
तहसील कार्यालयाच्या वतीने निवृत्ती वाघ व पोलीस प्रशासनाच्या वतीने जाफ्राबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक. प्रतापराव इंगळे व माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख कुंडलिक पाटील मुठ्ठे सध्या कार्यरत सी.आर पि.एफ जवान प्रमेश्वर जाधव यांच्या सह अनेकांनी स्मारकावर पुष्पगुच्छवाहून आदरांजली वाहत, “अमर रहे,अमर रहे, “शहीद जवान, अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा विविध देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या जाफ्राबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी शहीद जवान विषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये माजी सभापती प्रकाश पा. गव्हाड, विलास पा.शिंदे, लक्ष्मण शिंदे, संतोष ठाकरे, कोनड गावचे वीर पिता भीमराव नागरे माजी सैनिक भीमराव साळवे, डी.जे साळवे, शंकर ताठे, त्र्यंबक साळवे, रमेश खरात, नारायण महाले, एकनाथ परिहार, व ग्रामस्थ व त्यांचा मित्र परिवार,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कुंडलिक पा मुठ्ठे यांनी आभार मानुन राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
News Today 24 हुन अनिल जाधव
जाफ्राबाद /जालना