कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत.
मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले असून त्याचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. चिपळूण, खेड येथे पाणी भरल्याने रेल्वेच्या गाड्या स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.तर कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी स्थानकाजवळ रेल्वे रूळावर दरड कोळल्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. खेड दिवाणखवटी नातुवाडी बोगद्या नजिक माती आणि दगड रेल्वे रुळांवर आल्यामुळे मागील दीड तासांपासून येथील वाहतूक थांबवण्यात आली आहे.वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागू शकतो. अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे. मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबवण्यात आली. तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरी तर सावंतवाडी दिवा गाडी दिवाणखवटी स्थानकात थांबवण्यात आली आहे. येथे थांबवण्यात आलेली आहे.
प्रतिनिधी अनुभव भागवत.