रासे गावातील जिल्हा परिषद शाळेत रंगला बालचमुंचा दिंडीचा सोहळा
‘वारकर्यांच्या वेशभूषेतील लहान मुले,पालखी मिरवणुक व विठु नामाचा गजर’,अशा विठ्ठलमय वातावरणात जिल्हा परिषद शाळा रासे येथे रिंगण सोहळा रंगला. विठ्ठल,रखुमाई,संत तुकाराम,छोटी मुक्ताई,संत नामदेव व अन्य वेशभुषेत असलेली बालचमु खास आकर्षण ठरली. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील जि.प. शाळा रासे येथे आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.मुलांचे रिंगण करण्यात आले, मुलांच्या हाती भगवे झेंडे,मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन पाहुन खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.
एरवी शालेय गणवेशात असणारी मुले कपाळी बुक्का,पांढरा सदरा,गळ्यात टाळ,डोक्यावर टोपी आणि नऊवारीत आलेल्या मुली,केसात गजरा,ङोक्यावर तुळस आणि ‘विठ्ठल नामाची शाळा भरली,शाळा शिकताना तहान भुक हरली.’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल,रखुमाईच्या भक्तित दंग झालेले बालवारकरी शाळेमध्ये अवतरले. या वेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला.अन अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तिरसात तल्लिन झालेली पाहावयास मिळाली.
News today’s 24 साठी कुणाल शिंदे चाकण पुणे