देवळाली प्रवरा व राहुरी सायकलिंग ग्रुपच्या वतीने पंढरीच्या वाटेवर सीड बाँलच्या माध्यमातून वृक्षारोपन
देवळाली प्रवरा व राहुरी सायकलिंग अँड ट्रेकर्स ग्रुपच्या वतीने पंढरीची वारी करताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या सहकार्याने देवळाली प्रवरा ते पंढरपूर मार्गा वरील दुतर्फा मार्गावर सीड बाँलच्या माध्यमातून पेरणी करुन वृक्षारोपन करण्यात आले.250 कि.मी अंतरावर सीड बाँल पेरणी करण्याचा आनंद घेत.पंढरीची वारी सायकलिंग ग्रुपने 15 तासाच पुर्ण केली आहे. देवळाली प्रवरा ते पंढरपूर सायकलवारी पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या तरुणांसमोर देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी कल्पना मांडली.नगरपरिषदेच्या वृक्ष विभागाच्या माध्यमातून एक हजार सीड्स बॉल तयार केले.
देवळाली प्रवरा नगर परिषदेचे प्रशासकीय अध्यक्ष तथा प्रांतधिकारी किरण सावंत पाटील व मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी एक हजार सीड्स बॉल देवळाली प्रवरा सायकलिंग ग्रुप कडे सुपूर्त केले.सायकलवारीने देवळाली प्रवरा येथुन पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.राहुरी सायकलिंग ग्रुपचे सदस्य या सायकलवारीत सामिल झाले. निसर्गाचा आनंद घेत पंढरपूरच्या दिशेने प्रयान चालू ठेवले.सायकलवारी बरोबरच रस्त्याच्या दोन्ही बाजुला सीड बाँल पेरण्याचे काम करण्यात आले. अ.नगर ते करमाळा या नवीन मार्गावर रस्त्याचे काम झाल्याने दोन्ही बाजुने सीड बाँल लावण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध होती.
सायकलिंग ग्रुपने सायकल चालवा! पर्यावरण वाचवा! व निसर्गाचा समतोल राखा! हा संदेश देत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रम केला. सायकलिंग ग्रुपने सीड्स बॉलच्या माध्यमातून वृक्षरोपण करीत असताना नाशिक सायकलिंग ग्रुपच्या नलिनी कड व त्यांच्या सर्व सायकलिंगच्या ग्रुपचे सदस्य यांनीही सीड्स बॉलच्या माध्यमातून वृक्षरोपण करण्यास सहकार्य केले. देवळाली प्रवरा सायकलिंग ग्रुपच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल नाशिक सायकलिंग ग्रुपने देवळाली प्रवरा सायकलिंग ग्रुप चे अभिनंदन केले.
सीड्स बॉलचे रस्त्याने दुतर्फी वृक्षरोपण करण्यासाठी देवळाली प्रवरा नगर पालिकेचे प्रशासकीय अध्यक्ष तथा प्रांत अधिकारी किरण सावंत पाटील, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम,माजी नगरसेवक सचिन ढुस,मुख्याधिकारी विकास नवाळे व देवळाली प्रवरा नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.
पंढरीच्या वाटेवर सायकलवारी करताना या मार्गावर भक्तीमय वातावरणात विठ्ठलाचा जप करीत पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पायी जाणारे वारकरी हरीनामात तल्लीन झालेले पहावयास मिळत होते.या भक्तीमय वातावरणात 250 कि.मी.अंतर 15 तासात पुर्ण करता आले.पांडुरंगा चे दर्शन घेवून पुन्हा परतीचा प्रवास करण्यात आला.
सायकलवारीत देवळाली प्रवरा व राहुरी येथिल संभाजी वाळके,गोरख मेहेत्रे, राहुल दुधाडे,राजेंद्र चव्हाण, प्रवीण डावकर, सुदाम कडू, अशोक जाधव,निलेश लासुरकर, अनिल ढुस, नितीन शहाणे,अरुण ताकटे, आरिफ इनामदार, बाळासाहेब राऊत, कडूबा इंगळे, बाबासाहेब नागरगोजे, रमेश नालकर, वसंत पागिरे, सुनील शिंदे, विलास तरवडे, गायकवाड सर, मोरे सर, रवि हरिश्चंद्र, संदीप शेटे, रविंद्र मोरे आदींनी सहभाग घेतला होता.
News Today साठी राजेंद्र उंडे राहुरी