विशाळगड प्रकरणात आरोपींवर युएपीए अंतर्गत कारवाई करा व इतर मागण्यासाठी लातुर एमआयएम चे धरणे प्रदर्शन
उपजिल्हाधिकारी यांची भेट व निवेदन.
विशाळगड येथे मुस्लिम समाजावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येऊन या धरणेद्वारे जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे सहा मागण्या करण्यात आल्या असून त्यात हल्लेखोरांवर युएपीए अंतर्गत कारवाई करा ,निष्क्रिय व कर्तव्यात कसूर करणारे प्रशासकीय अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा , हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळ व लोकांची घराचे नुकसान झाले आहे त्यांची नुकसान भरपाई द्या, जे या हल्ल्यात जखमी झाले त्यांना सरकारने प्रत्येकी ५ लाख रुपये द्यावे, मुस्लिम समाजावर होत असलेल्या हल्ल्यासाठी हल्ले थांबवण्यासाठी मुस्लिम समाजासाठी संरक्षण कायदे विशेष अधिवेशन बोलवून पारित करण्यात यावे व या संपूर्ण घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी अशा मागण्या गाँधी चौक, लातुर येथे एमआयएम पक्षातर्फे झालेल्या धरणे आंदोलना मार्फत करण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्याचे प्रमुख इम्तियाज जलील यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात १९ जुलै रोजी दुपारी २ ते ४ वाजे पर्यंत धरणे प्रदर्शन आयोजित करण्या चे आदेश होते त्यानुसार लातुर जिल्हा एमआयएम अध्यक्ष ॲड.मुहम्मदअली शेख़ यांनी धरणे प्रदर्शन चे आयोजन गाँधी चौक, लातुर येथे केले होते त्यात हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती.
News today 24 असलम शेख लातुर,