देशी कट्ट्या सह शस्त्र जप्त दोघे जण ताब्यात, पुसद एलसीबी पथकाची कामगिरी
पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडगाव येथे दोन इसमांकडून देशी कट्टा मिळून आल्याची बाब स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध मोहिमेत आढळून आली. त्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन शस्त्र कोणाकडून मिळाले व ते कशासाठी वापर होणार होता याचा खुलासा पोलीस कस्टडी मधूनच मिळणार असल्याने सदर दोन्ही आरोपीस विद्यमान न्यायालयात हजर करून याचा सुगावा लावणार असल्याचे कळते.
पुसद तालुक्यातील वडगांव येथील आरोपी शैलेश चव्हाण व गौरव चव्हाण यांनी पुसद मध्ये वाढदिवसाच्या दिवशी देशी कट्टा घेऊन फोटो काढल्याची माहिती मिळाल्याने त्याचे शोध कार्य सुरू झाले आणि शेवटी काल दुपारी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक देशी कट्टा हस्तगत करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. सदरची यशस्वी कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजभारे, पोलीस उपनिरीक्षक लोहकरे, हेड कॉन्स्टेबलसुभाष जाधव, रमेश राठोड, तेजाब रनखांब, कुणाल मुंडोकार तसेच चालक पोलीस उपनिरीक्षक रेवन जागृत व रवी श्रीरामे यांनी पार पडली.
देशी कट्ट्यासह दोन्ही आरोपींना ग्रामीण पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत व पोलीस संदेश पवार, हनुमान गंगासागर यांनी पुढील तपासास सुरुवात केली आहे.