रासे गावातील श्री रेणुका देवीचा भंडारा आयोजन.
चाकण जवळील रासे गावातील डोंगरावर असलेल्या श्री रेणुका देवी मातेच्या भंडारा येत्या मंगळवार या दिवशी आयोजन करण्यात आले आहे.नवसाला पावणाऱ्या या देवीच्या दरवर्षी प्रमाणे भंडारा मोठ्या उत्साहाने संपन्न होणार असुन ग्रामस्थांनी व भाविकांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे देवस्थान कडून आवाहन करण्यात आले आहे.दरवर्षी या मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी व बोललेला नवस फेडण्यासाठी तालुक्यातुन येत असतात.खेड तालुक्यात एकमेव असलेले श्री रेणुका मातेचे मंदिर असुन अनेक भाविक आषाढ महिन्यात व नवरात्रीला या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या माहुरगडची श्री रेणुका देवीचे हुबेहूब रूप व सुबक मूर्ती खेड तालुक्यातील रासे गावातील डोंगरावर रेणुका देवीच्या मंदिरात विराजमान आहे.अत्यंत सुबक काळया पाषाणातील देवीची मुर्ती या ठिकाणी पाहायला मिळते.
News today 24 साठी कुणाल शिंदे चाकण पुणे