31 जुलै रोजी अंबाजोगाईत स्वर सुमनांजली कार्यक्रमाचे आयोजन.
स्वर्गीय मोहम्मद रफी स्वर्गीय किशोर कुमार व स्वर्गीय मुकेश यांच्या यांच्या स्मृतीत आयोजन
(अंबाजोगाई )
कलाकार कट्टा,अंबाजोगाई प्रस्तुत स्व. मोहम्मद रफी, स्व. किशोरकुमार व स्व. मुकेश यांच्या स्मृतीत ‘वो जब याद आए बहुत याद आए’
स्वरसुमनांजली कार्यक्रम दि.३१जुलै २४ रोजी सायं. 6 वा.बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन, नगर परिषद अंबाजोगाई आयोजित करण्यात आला आहे. रसिक मंडळ अंबाजोगाई,वसुंधरा सेवा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न होत असून या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी श्री दीपक वजाळे साहेब, गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाने काळे, पुरवठा अधिकारी मिलिंदजी गायकवाड, संजय गंभीरे, मा. नगराध्यक्ष महादू मस्के व अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांची उपस्थिती असणार आहे. या स्वरसमनांजली कार्यक्रमांमध्ये स्वर्गीय रफी साहेब स्वर्गीय मुकेश जी व स्वर्गीय किशोर कुमार यांची सदाबहार गाणी अंबाजोगाई येथील सर्व कलावंत सादर करणार असून यानिमित्ताने अनेक नव्या जुन्या कलावंतांना व्यासपीठ निर्माण होणार आहे. अंबाजोगाई व परिसरातील शालेय महाविद्यालयीन व विविध व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या इच्छुक कलावंतांसाठी कलाकार कट्टा व रसिक मंडळ सदैव कार्यरत असणार असून या निमित्ताने अनेक कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. दिनांक 31 जुलै 2024 रोजी आयोजित केलेल्या स्वर सुमनांजली या कार्यक्रमासाठी सर्व कलावंत रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कलाकार कट्टा चे संस्थापक अध्यक्ष तालमार्तंड प्रकाश बोरगावकर रसिक मंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीनिवास रेड्डी, मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष श्री दत्ता आंबेकर, गजानन मुडेगावकर सूत्रसंचालन श्री परमेश्वर गीते, तुकाराम सुवर्णकार, अभय जोशी, अनंत आरसुडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.