ॲड. सारंग रामराव मुंडे विद्यापीठात प्रथम
अंबाजोगाई/प्रतिनिधी: येथील ॲड. सारंग रामराव मुंडे यांनी विधी शाखेच्या पदव्युत्तर परीक्षेत मुंबई विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ॲड. सारंग रामराव मुंडे यांनी विधी शाखेत पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी करिता गुणवत्तेवर प्रवेश मिळाला होता. मुंबई विद्यापीठ 2023- 24 मध्ये घेतलेल्या पदव्युत्तर पदवी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात ॲड. सारंग मुंडे यांनी मुंबई विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. या परीक्षेसाठी ॲङ सारंग मुंडे यांना मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक वृंद ॲड. एस .बी. डिघोळे ॲड.आर. एस. डिघोळे, ॲड. बी. आर. तिडके व ॲड.एम. बी. आदमाने यांचे मार्गदर्शन मिळाले. ॲङ सारंग मुंडे हे भावठा केंद्राचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख रामराव मुंडे यांचे चिरंजीव आहेत.