नेवासा तालुक्यातील बोगस मतदान तात्काळ रद्द करा. भाजप जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांची मागणी
नेवासा प्रतिनिधी:
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील नवीन मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक गावात अन् बुथवर संबंधित BLO नोंदणी प्रक्रिया राबवत आहेत. सन 2019 मधील नेवासा विधानसभा संघाच्या मतदार यादीत 14,000 मतदार मयत, दुबार व बोगस असल्याचे निदर्शनात आले होते. यामुळे नेवासा विधानसभा मतदारसंघाची छबी ही राज्यामध्ये खालावली आहे. याबाबत आपणास लेखी पत्र देऊन तक्रार दिली होती. त्यानंतर तपासणी मोहीम राबवून, या पैकी 7000 बोगस नावे वगळण्यात आली आहेत. आमच्या असे निदर्शनास आले आहे की, निवडणुकीची भीती असणारे काही संभाव्य उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी पुन्हा बोगस मतदार नोंदणी करून घेत आहेत. हा अक्षम्य गुन्हा आहे. त्याचे परिणाम प्रामाणिक काम करणाऱ्या मतदारांना आणि इतर उमेदवाराना भोगावे लागतात.नेवासा तालुक्यात असे निदर्शनात आले आहे कि, काही शिक्षण सम्राट आणि साखर कारखानदार हे त्यांच्या यंत्रणेचा गैरवापर करून त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या शिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेण्यासाठी नेवासा मतदार संघा बाहेरून आलेल्या विद्यार्थी अन् त्यांच्या पालकांना धाक दाखवून, नेवासा तालुक्यातील विविध बूथ वर मतदार यादी मध्ये नाव नोंदवण्याची सक्ती करत आहे. त्यासाठी BLO वर दबाव आणला जात आहे. शिक्षणासाठी विद्यार्थी म्हणून आलेल्या व्यक्तीचे नाव नेवासा विधानसभा मतदार यादी मध्ये घेण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.यासंदर्भात नेवासात तहसीलदार यांना निवेदन दिले गेले. याप्रसंगी एडवोकेट विश्वास काळे, निरंजन डहाळे ,सुनील हारदे, महेश नवले ,संभाजी जगताप आप्पा, अरुण मस्के आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.