ढगाळ वातावरण सततच्या रिमझिम पाऊसात सोयाबीन पिकात जैविक किडनियंत्रन आवश्यक.–राजेंद्र जाधव.
अंबाजोगाई प्रतिनिधी – सध्या ढगाळ वातावरण सतत चा रिमझिम पाऊस यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन पिकात जैविक किड नियंत्रण करणे आवश्यक आहे जैविक किड नियंत्रण शेतकऱ्यांनी करावे असे आव्हान प्रगतशील शेतकरी राजेंद्र जाधव यांनी केले आहे
अंबाजोगाई तालुक्यातील श्रीपतरायवाडी येथील प्रगतशील शेतकरी वाँटरशेड आँर्गनायझेशन ट्रस्टचे क्षेत्रीय अधिकारी श्री राजेंद्र जाधव यांनी स्वतः च्या शेतात रुंद सरिवरंबा (बि बि एफ) पध्दतीने व टोकन पध्दतीने सोयाबीन पेरणी केली आहे. या पध्दतीमुळे अतिरिक्त पानी सरीवाटे बाहेर निघुन जाते हवा खेळती राहते.आमच्या शेतात या दोन्ही पध्दतीने टोकन केल्यामुळे नक्कीच फायदा झाला आहे.सतत ढगाळ वातावरणामुळे रसशोषक किडी व अळी प्रमाण वाढले आहे यावर प्रभावी उपाय म्हणजे जैविक किडनियंत्रन चिकटसापळे, कामगंधसापळे, पक्षीथांबे यांचा वापर करने शेतात लावणे आम्ही लावले ईतर शेतकरी बांधवांनी याचा वापर करावा असे आव्हान राजेंद्र जाधव यांनी केले आहे… तसेच पाऊसाची उगडझाप पाहुन निंबोळी आर्क,दशपर्णी आर्क शेतकरी बांधवांनी फवारणी करून घ्यावी असेही आव्हान केले आहे… यावेळी तनिष्का सदस्या श्रीकंन्या जाधव, आत्माराम आस्वले,प्रशांत जाधव,माधव आस्वले,पंकज जाधव उपस्थित होते.