छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेनेला मोठा धक्का…।
छत्रपती संभाजीनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र देवकर यांचा आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये जाहीर पक्ष प्रवेश सोहळा मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पारपडला आसून छत्रपती संभाजीनगर मध्ये युवा सेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
काही अंतर्गत गटबाजी मुळे मच्छिंद्र देवकर यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आता ग्रामीण भागात ऐकू येत आहे.
या पक्ष प्रवेशाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधीःविशाल जोशी गंगापूर