कॉस्मो फाउंडेशनच्या वतीने न्यू हायस्कूल ढोरेगाव येथे संगणक लॅबचे उद्घाटन संपन्न.
गंगापूर तालुक्यातील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक ढोरेगाव येथे स्वतंत्र संगणक लॅब सुरू करण्यात आली असून, या लॅबमध्ये १५ संगणकांचा समावेश आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळवून देणे आहे. कॉस्मो फाउंडेशन आणि कॉस्मो फिल्म्स लिमिटेड वाळूज, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने या संगणक लॅबचे उद्घाटन सोहळा आज(३०जुलै मंगळवार) शालेय समिती अध्यक्ष तथा सरपंच आय्युब पटेल यांच्या हस्ते पार पडला . उद्घाटन सोहळ्याला कॉस्मो फिल्म्सचे विविध कर्मचारी वर्ग उपस्थित होते. त्यामध्ये विनोद मूर्ती, रोहित महाजन, शरणाप्पा कदारे, अभिजीत वैद्य, देवेंद्र पाटील याची प्रमुख उपस्थिती होता.
शिक्षक वृंद देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
रजत बाठे यांनी विद्यार्थ्यांना कॉस्मो फाउंडेशनच्या प्रकल्पाची माहिती दिली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना करियर विषयक मार्गदर्शन केले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापकांनी श्रीकांत झिरपे यांनी काँस्मो फाउंडेशनचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प समन्वयक रजत बाठे, क्लस्टर समन्वयक सहदेव लिहिणार, अमोल पल्हाळ, लक्ष्मीकांत बनकर, संध्या तारक, संगणक शिक्षक यास्मिन श्रीकर मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गंगाधर सुदावळे तर आभार प्रदर्शन पाटील यांनी मानले.
प्रतिनिधी.विशाल जोशी गंगापूर