अम्पाच्या माध्यमातून अंबाजोगाई तालुक्यातील सर्व पॅथींच्या डॉक्टरांना अभिनव मेजवानी
वेगवेगळ्या विषयांची कार्यशाळा आणि व्याखानामुळे डॉक्टर बांधवांमध्ये चैतन्य
अंबाजोगाई / प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरात गेल्या दोन वर्षापूर्वी डॉ. नरेंद्र काळे, डॉ. राहुल धाकडे यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या अॅम्पा अर्थात अंबाजोगाई मेडीकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनने गेल्या दोन वर्षात एम.बी.बी.बी.एस., बी.डी.एस., बी ए. एम. एस. बी.एस. एम. एच., बी. यू. एम. एस. फिजियोथेरपी, सर्व पॅथींच्या डॉक्टरांची मोट बांधून त्यांना एक संघ केले. पूर्वी हे सर्व डॉक्टर स्वतःच्या मर्यादित संघटनेपुरते होते. परंतु सर्वांची मोट एकत्र बांधून त्यांना एका छत्रछायेखाली आणण्याचे काम केले. गेल्या दोन
वर्षात अॅम्पाने उत्कृष्ट अशी कामगिरी करून लौकिक प्राप्त केला. दोन वर्षांच्या यशस्वी कालखंडानंतर अॅम्पाकॉन २०२४ चे आयोजन रविवार, दि. २८ जुलै २०२४ रोजी करण्यात आले. यामध्ये दिवसभर राज्यभरातील तज्ञ डॉक्टर यांचे मार्गदर्शन व व्याख्यान आयोजित करून त्यांचे अनुभव कथन करण्यात आले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. अॅम्पाकॉनला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आणि आयोजनाबद्दल अॅम्पाचे अनेकांनी कौतुक केले.
. डॉ. नरेंद्र काळे व डॉ. राहुल धाकडे यांनी दोन वर्षांपूर्वी अंबाजोगाई शहरात अभिनव असा प्रयोग करून अंबाजोगाई तालुक्यातील सर्व पॅथींच्या डॉक्टरांची मोट बांधून त्यांना एकसंघ करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या उपक्रमाला तालुक्यातील सर्व पॅथींच्या डॉक्टरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. एक व्यापक संघटन
त्यांच्या या उपक्रमाला तालुक्यातील सर्व पॅथींच्या डॉक्टरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. एक व्यापक संघटन या निमित्ताने पहावयास मिळाले. कुठल्याही पॅथीच्या डॉक्टरावर अन्याय झाला तर सर्व पॅथींचे डॉक्टर हे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याचे चित्र या निमित्ताने दिसून आले. अॅम्पा ही संघटना अंबाजोगाई तालुक्यातील सर्व डॉक्टरांची जिव्हाळ्याची व आपुलकीची संघटना बनली. गेल्या दोन वर्षात २०० डॉक्टरांना सोबत घेऊन सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवून एक वेगळा पायंडा पाडला आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद अधिक वाढवण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला. संघटनेची ताकद काय आणि कशी असते. हे दोन वर्षांच्या कार्यकालात दिसून आले. डॉ. राहुल धाकडे व त्यांच्या टीमने प्रत्येक सण, उत्सव, परंपरा, सामाजिक भान राखून कार्यक्रम घेतले आणि
वर्षांच्या कारकिर्दीचा समारोप आणि नूतन कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम रविवार, दि, २८ जुलै रोजी अंबाजोगाईतील हॉटेल पीयुष इन या ठिकाणी करण्यात आला. या निमित्ताने अॅम्पाकॉन २०२४चे आयोजन करण्यात आले. यामध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत वेगवेगळ्या विषयांवर मान्यवर डॉक्टरांचे व्याख्यान आणि अनुभव विषद करण्यात आले. अॅम्पाकॉनचे उद्घाटन स्वा.रा.ती. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅम्पाचे मार्गदर्शक डॉ. दिलीप खेडगीकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलचे निरीक्षक डॉ. अभिमन्यू तरकसे, लातूर येथील प्रसिद्ध डॉ. रमेश भराटे, बालरोगतज्ञ डॉ. श्रीनिवास रेड्डी, अॅम्पाचे अध्यक्ष डॉ. राहुल धाकडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उद्घाटक डॉ. शंकर धपाटे म्हणाले की, अंबाजोगाई शहरामध्ये सामान्य माणसाला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी हा प्रत्येक डॉक्टराचा प्रयत्न आहे. अंबाजोगाई शहरामध्ये शासकीय रुग्णालय आहे. त्यासोबतच खाजगी रुग्णालये सुद्धा आपली सेवा चांगल्या पद्धतीने देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अॅम्पाकॉनसारखे उपक्रम राबविण्यात आल्याने स्थानिक डॉक्टरांना आपल्या परिसरातील व दूरवरच्या डॉक्टरांचा सखोल अभ्यास व त्यांचे अनुभव या निमित्ताने ऐकण्याची संधी मिळते. अॅम्पा संघटनेने चांगली संधी या निमित्ताने उपलब्ध करून दिली आहे. अशा उपक्रमाने संघटनेसोबत डॉक्टरांच्या कामामध्ये व अनुभवामध्ये याचा भर पडतो. त्यामुळे अॅम्पाने आयोजित केलेल्या उपक्रमाला आपण शुभेच्छा देत असल्याचे सांगितले तर अध्यक्षीय समारोप करताना डॉ. दिलीप खेडगीकर म्हणाले की, अंबाजोगाई शहरात अम्पा संघटना ही गौरवास्पद
काम करत आहे. वैद्यकीय सेवा ही खऱ्या अर्थाने देवदूताचे काम आहे. या कामाला जागून प्रत्येकजण धडपडतो आहे. शिवाय अॅम्पा संघटना ही डॉक्टर व रुग्ण यांच्या संवादासोबतच सामाजिक जाणिवेतून उत्कृष्ट
असे काम करत आहे. रुग्णांना वैद्यकीय सेवेसोबतच ज्या काही चांगल्या आणि मोफत देण्यासारख्या योजना आणि सेवा आहेत. तो देण्याचा प्रयत्न असतो. दरवर्षी वेगवेगळ्या आजारासंबंधीचे शिबिरे, कार्यशाळा, आयोजित करून या शिबिराचा लाभ रुग्णांना व्हावा. हा प्रयत्न राहिलेला आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालखंडामध्ये अनेक समाजाभिमुख उपक्रम आयोजित करून सर्व डॉक्टर बांधवांना त्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे अॅम्पाकॉनच्या माध्यमातून जे विषय हाताळण्यात आले. ते सुद्धा कौतुकास्पद असल्याचे सांगत आपण यात सहभागी झाल्याचा आनंद सर्वस्वी असल्याचे डॉ. खेडगीकर यांनी सांगितले. तर प्रास्ताविक अॅम्पाचे अध्यक्ष डॉ. राहुल धाकडे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात डॉ. राहुल धाकडे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपूर्वी अॅम्पाची स्थापना झाली. त्यावेळी असे वाटले नाही की, ही संघटना एवढा मोठा आकार घेईल. प्रत्येकाचे योगदान आपआपल्या परीने राहिले आहे. सर्वांनी एक दिलाने उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला. मी चेहरा असलो तरी प्रत्येकाची भूमिका व सहभाग तेवढाच राहिलेला आहे. दोन वर्षे काम करत असताना वेगवेगळे अनुभव आपल्या पाठिशी आहेत. परंतु जे उपक्रम घेण्यात आले. त्यातून नक्कीच अनेकांना आनंद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगले काम करत असताना अपवादाने किंवा नजर चुकीने काही गोष्टी घडल्या असतील त्या मला परत देऊन टाका आणि पुन्हा नव्या जोमाने अॅम्पाच्या कार्याला गती देवू या असे आवाहन करत अनेक कार्यक्रम आयोजित करून प्रत्येकाला सामावून घेण्याचा प्रयत्न केला. अंबाजोगाई शहरातील व
तालुक्यातील डाक्टर बांधवाचे एक मजबूत संघटन डॉक्टरांच्या सहकार्याने आपण उभे करू शकलो. याचा मनस्वी आनंद आहे. जे काम हाती घेतले त्याला बऱ्याच प्रमाणात यश आले आहे. उर्वरित काम पुढची कार्यकारिणी व सहकारी मित्र करतील असा विश्वास वाटतो. शिवाय गेल्या दोन वर्षात ज्यांनी-ज्यांनी मला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य केले त्यांचे ऋण व्यक्त करत आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर केलेले सहकार्य आपण कधीच विसरू शकत नसल्याचे डॉ. राहुल धाकडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अम्पाचे उपाध्यक्ष डॉ. मनोज वैष्णव, सचिव डॉ. विठ्ठल केंद्रे, कोषाध्यक्ष डॉ. महेश ढेले, सहसचिव डॉ. शितल सोनवणे, ऍलोपॅथी समन्वयक सुधीर धर्मपात्रे, होमिओपॅथी समन्वयक डॉ. योगिनी नागरगोजे, डेंटल समन्वयक डॉ. ऋषिकेश घुले, कल्चरल सेक्रेटरी डॉ. मनीषा पवार, स्पोर्ट सेक्रेटरी डॉ. इमरान अली, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक डॉ. सुलभा पाटील, डॉ. शिवाजी मस्के,यांनी प्रयत्न केले.तर अम्पाकॉन २०२४ साठी परिसरातील डॉक्टर बंधू -भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
. अम्पाकॉन मध्ये दिवसभराच्या सत्रात पुढील नामवंत डॉक्टरांनी सहभाग नोंदवला ज्यात ५ इफेक्टीव्ह वेज ऑफ बॉडी क्लिनिग या विषयावर डॉ. रंजीत निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. अप्रोच टू किडनी डिसॉर्डर या विषयावर डॉ. प्रमोद घुगे, यांनी मार्गदर्शन केले. तर यांत डॉ. एन. पी. देशपांडे, डॉ. गोपाळ पाटील, डॉ. सुधीर धर्मपात्रे यांनीव सहभाग नोंदवला. डेंटल इम्प्लांट गुनटू ह्यूमन काईंड या विषयावर डॉ. राहुल लटोरिया यांनी मार्गदर्शन केले तर डॉ. नरेंद्र काळे, डॉ. ऋषिकेश घुले, डॉ. मोहन मुंदडा यांनी सहभाग नोंदवला. पोस्ट कोविड सिक्वेल इन रिसपेरेटेररी डायसिस या विषयावर डॉ. रमेश भराटे यांनी मार्गदर्शन केले तर डॉ. राहुल धाकडे, डॉ. अनिल मस्के, डॉ. रमेश लोमटे आदिंनी सहभाग नोंदवला. अॅटोमिनियम डिसॉर्डर अँड होमियोपॅथी, या विषयांवर डॉ. अशोक बोनगुलवार यांनी मार्गदर्शन केले तर यात बाळासाहेब हाके, डॉ. विठ्ठल केंद्रे, डॉ. योगिनी नागरगोजे यांनी सहभाग नोंदवला. रिसेंट अॅडव्हान्स इत मॅनेजमेंट ऑफ स्टोक या विषयावर डॉ. निलेश
नागरगोजे यांनी मार्गदर्शन केले तर डॉ. सचिन चौधरी, डॉ. विवेक मुळे, डॉ. श्रीनिवास रेड्डी यांनी सहभाग नोंदवला. आर्युवेद अँड अॅडीशनल डायमेनेशन ऑप हॉलिस्टीक ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर या विषयावर डॉ. रंजित निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. तर यात डॉ. अतुल देशपांडे, डॉ. शिवाजी मस्के, डॉ. सुलभा पाटील यांनी मार्गदर्शन केले. अप्रोच टू चेस्ट पेन या विषयावर डॉ. दीपक कटारे यांनी मार्गदर्शन केले तर यात डॉ. नवनाथ घुगे, डॉ. संदीप थोरात, डॉ. मधुसुदन बाहेती यांनी सहभाग नोंदवला. अप्रोच टू कॅन्सर डायग्नोसिस या विषयावर डॉ. प्रियंका राठोड यांनी मार्गदर्शन केले. तर
घुगे, डॉ. संदीप थोरात, डॉ. मधुसुदन बाहेती यांनी सहभाग नोंदवला. अप्रोच टू कॅन्सर डायग्नोसिस या विषयावर डॉ. प्रियंका राठोड यांनी मार्गदर्शन केले. यात डॉ. नितीन चाटे, डॉ. अरूणा केंद्रे व डॉ. हनुमंत चाफेकर यांनी सहभाग नोंदवला. एकूणच या कार्यक्रमातदून अनेकांना मान्यवरांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी मिळाली.