वतमाळात ०३ तलवारी जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
यवतमाळ/ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, पो.स्टे. यवतमाळ शहर व अवधुतवाडी परिसरात आरोपी शोध व पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, आंबेडकर नगर, पाटीपुरा येथे ०१ इसम काहीतरी गैरकृत्य करण्याचे इराद्याने त्याचे ताब्यात तलवारी बाळगत असल्याबाबत खात्रीशिर माहिती मिळाल्यावरुन नामे प्रविण बंडु पवार वय २९ वर्ष रा. आंबेडकर नगर, पाटीपुरा, यवतमाळ यास ताब्यात घेऊन त्याचे घराच्या झडतीत ०३ लोखंडी तलवार मिळाल्या त्यास अवैधरित्या तलवारी बाळगण्याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली त्याचे कडून एकुण ०३ तलवारी किंमत ३,०००/- रुपयाच्या जप्त करुन कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा, १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये पुढील कारवाई करणेकरीता पो.स्टे. यवतमाळ शहर यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात सपोनि सुगत पुंडगे, पोलीस अंमलदार योगेश गटलेवार, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, कविश पाळेकर, आकाश सहारे, मुश्ताक शेख सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.